Maharashtra Political News : 'गोपीनाथ मुंडे आणि मी ३०-३५ वर्षे...'; आमदार एकनाथ खडसेंनी केला गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

Eknath Khads News : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खडसे यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवण देखील भाजपला करून दिली. (Latest Marathi News)

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, भाजपने नेहमीच ओबीसींची हेळसांड केलेली आहे. भाजपमध्ये (BJP) आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर , गोपीनाथ मुंडे यासारख्या अनेक नेत्यांना अपमान सहन करावा लागला. त्याचबरोबर त्रास देण्यात आला. त्यानंतर माझी आणि पंकजा मुंडे यांचीही छळवणूक करण्यात आली'.

Eknath Khadse
Maharashtra Political News :...तर ते सर्वच्या सर्व आमदार उद्धव ठाकरेंकडे परततील; राज्याच्या माजी मंत्र्यांचं मोठं विधान

'सर्व नेते पक्षाशी एकनिष्ठ राहून पंकजा ताईंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. आता पंकजा मुंडे या सक्षम नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे, असे खडसे म्हणाले.

'आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे यांना आता ओबीसी चेहरा पाहिजे. पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे, असेही खडसे म्हणाले.

'गोपीनाथ मुंडे आणि मी तीस-पस्तीस वर्षे एकत्र काम केलं. त्यावेळी वाणी -ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला आमच्यामुळे सर्वसामान्यांच्या पक्ष म्हणून ओळख मिळाली. पूर्वी भाजपमध्ये ओबीसींना घेत सुद्धा नव्हते. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने किती त्रास दिला हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.

Eknath Khadse
Navjot Singh Sidhu News: नवज्योत सिंग सिद्धू उद्या तुरुंगातून बाहेर येणार; काय होतं प्रकरण?

'इतकंच काय त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघण्यास भाग पाडलं. मध्यंतरी त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा आला होता. तीच परिस्थिती आता पंकजा मुंडेंवर ओढावलेली आहे. सातत्याने भाजपने ओबीसींवर अन्याय करण्याची नीती अवलंबली तरीही ओबीसींनी पक्ष वाढवण्यासाठी मदत केली, असेही खडसे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com