
Amol Kolhe Twitter Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. या प्रकरणी आता अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्याकडून घाई गडबडीत आणि अनावधानाने बेळगावचा बेळगावी असा उल्लेख झाला, असे स्पष्टीकरण कोल्हेंनी दिलं आहे. आपल्या भावना दुखावल्यात्याबद्दल सर्वांची माफी मागतो, असंही कोल्हे म्हणाले. यासंबधीचा एक व्हिडिओ अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे. (Latest Marathi News)
व्हिडिओमध्ये काय म्हणाले अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, "जय शिवराय, बेळगाव येथे राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण होतं म्हणून मला या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु माझ्या अनेक सीमाभागातील बांधवांनी, अनेक हितचिंतकांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागच्या पार्श्वभूमीची मला कल्पना करून दिली. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी माझ्याकडून अनावधानाने आणि घाई गडबडीत बेळगावचा चुकीचा उल्लेख झाला. त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. (Maharashtra Political News)
"पण मी माझ्या सीमा बांधवांबरोबर मी ठामपणे उभा आहे आणि त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या आग्रही मागणीवरून 5 तारखेचा बेळगाव मधल्या राजहंस गडावरच्या माझा येण्याचा कार्यक्रम मी रद्द करतो. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. तुमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्याबरोबरच मी ठामपणे उभा आहे. त्याविषयी विश्वास बाळगा, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी यावेळी दिलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.