Sharad Pawar News: राष्ट्रवादीची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरली; शरद पवारांनी स्पष्ट केली राजकारणाची दिशा

Sharad Pawar News: २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ज्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागेवरील परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

Mumbai News: देशात आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीनेही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. आता महाविकास आघाडीची लोकसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाचीही चर्चा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ज्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागेवरील परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत. (latest Marathi News)

एका वृत्तपत्रानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकी आधीच पक्षाची निवडणुकीत काम करण्याची दिशा स्पष्ट केली आहे. शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना राष्ट्रवादी २०१९ च्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ज्या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागांचा आढावा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. या आढाव्याच्या आधारावरच राष्ट्रवादी जागा वाटपाच्या होणाऱ्या बैठकीत पक्षाची भूमिका मांडणार आहे.

Sharad Pawar
Sanjay Raut on Lok Sabha Election 2024: आमचा लोकसभेत खासदारांचा १९ आकडा कायम राहणार; संजय राऊतांचा मोठा दावा

राष्ट्रवादीने गेल्या लोकसभा निवडणुकीत १९ जागा लढवल्या होत्या. यापैकी राष्ट्रवादीने ४ जागा जिंकल्या होत्या. तर काही जागा राष्ट्रवादीने मित्र पक्ष आणि इतर घटक पक्षाला सोडल्या होत्या.

'सध्याची राजकीय परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचे भाग आहेत. आम्ही २०१९ च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा पुन्हा आमच्याकडे राहतील. तर मागील निवडणुकीत ज्या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या जागेची देखील सध्याची परिस्थिती तपासणार आहोत, अशी माहिती पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने दिली .

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १२ जागांवर राष्ट्रवादीचा थेट सामना शिवसेनेशी झाला होता. शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीत बुलढाणा, नाशिक, कल्याण, मावळ, कोल्हापूर या जागेवर बाजी मारली, परंतु सध्या या खासदारांनी शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत अपक्ष उमेदावर नवनीत राणा यांना देखील पाठिंबा देऊ केला होता. त्या राणा देखील सध्या भाजपला विचाराकडे झुकल्या आहेत.

Sharad Pawar
Supriya Sule On Political leaders: पक्ष बदलणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचा सल्ला; जिथे जाल तिथं...

'आम्ही मागील निवडणुकीत ज्या जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होतो, त्याचं तपशीलवार विश्लेषण करणं आवश्यक आहे. येत्या आठवड्यात सुरू होणार्‍या जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान या बाबी मांडू, असेही राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com