NCP News : सरकारला धारेवर धरत राष्ट्रवादी काँग्रेसचं चिखलीत आंदोलन

गेल्या काही महिन्यांपासून गॅसच्या दरात वाढ हाेत आहे.
buldhana , ncp , protest
buldhana , ncp , protestsaam tv

NCP News : उत्सव काळात (Ganeshotsav) देखील सर्व सामन्यांना जीवनावश्यक वस्तु तसेच इंधन आदी गाेष्टी महाग मिळू लागल्याने अनेक कुटुंबांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. परिणामी काही जण आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. त्यामुळं राज्य व केंद्र सरकारनं जीवनाश्यक वस्तुंचे भाव कमी करावेत या मागणीसाठी एनसीपीनं (NCP) चिखलीत आंदाेलन छेडलं. या आंदोलनात कार्यकर्त्यासह असंख्य नागरिक सुद्धा सामील झाले होते.

या आंदाेलनाच्या प्रारंभी एनसीपीच्या पदाधिका-यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणाले जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. सामान्य व गरीब जनता होरपळली जात आहे. केंद्र व राज्य सरकारनं तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी केले पाहिजेत.

buldhana , ncp , protest
'झोपडपट्टीची दादागिरी आमच्या पुढं नकाे, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत'; आमदार गायकवाडांना सेनेचं प्रत्युत्तर

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले. गॅस ,पेट्रोल डिझेल व अनेक जीवनावश्यक वस्तूच्या रोजच्या वाढत्या महागाई विरोधात सर्वसामान्य माणसाला जगणे अवघड झाले असून शासनाने तात्काळ जीवनावश्यक वस्तूचे भाववाढ कमी करावी. अन्यथा येत्या काही दिवसात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com