Jayant Patil : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यांवरून जयंत पाटलांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले,एकही मायचा लाल...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली.
jayant patil
jayant patil saam tv

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषावर वादग्रस्त वक्तव्ये केली, त्यावेळी एकही मायचा लाल पुढे आला नाही. राज्यपाल चुकले आहे, असं म्हणाला नाही. यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि महापुरुषांचे देणे घेणे नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली. (Latest Marathi News)

jayant patil
MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं पोलिसांशी घातली हुज्जत, बाचाबाचीचा VIDEO व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) बीडच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये मराठवाडा मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारानिमित्त जाहीर मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात जयंत पाटील उपस्थितांना संबोधित करताना पुढे म्हणाले, 'भाजप सरकारचे खायचे दात आणि दाखवायची दात वेगळे आहेत. भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवरायांचा अपमान झाला तरी तसूभरही वाईट वाटत नाही. आता तुमच्या माझ्या मनातील महापुरुषांच्या प्रतिमा कमी झाल्या पाहिजे, या साठी फंडिंग करून चित्रपट बनवायला सुरुवात केली आहे'.

'आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र का आली, तर या धर्मांध शक्ती आणि महापुरुषांना महत्त्व कमी करणाऱ्या शक्ती विरोधात लढायचं आहे असे देखील जयंत पाटील म्हणाले. पुढील काळात तुम्हाला मला व्यक्ती स्वातंत्र्य राहील का नाही ? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

'आम्ही सगळे एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या (BJP) भ्रष्ट विरोधात आवाज उठवत आहोत. तुम्ही साथ द्या, असे म्हणत जयंत पाटील यांनी मतदारांना आवाहन केले. दरम्यान जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना अचानक लाईट गेलं काही वेळ पाटलांना आपलं भाषण थांबवावं लागलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com