राष्ट्रवादीकडून नाना पटोलेंचा कडाडून निषेध; नेत्यांचा एकेरी उल्लेख महागात
राष्ट्रवादीकडून नाना पटोलेंचा कडाडून निषेध; नेत्यांचा एकेरी उल्लेख महागात Saam Tv News

राष्ट्रवादीकडून नाना पटोलेंचा कडाडून निषेध; नेत्यांचा एकेरी उल्लेख महागात

शनिवारी जळगाव जामोद येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये पटोलेंच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

बुलडाणा: येत्या निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोणासोबतही युती करणार नाही व सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. यानंतर मागील आठवड्यात शेगावात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांवर वेगळ्या शब्दात टीका करून बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करीत त्यांचे दुकान बंद करण्याची टिपणी केली होती. दरम्यान या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कडाडून निषेध करण्यात आला आहे. शनिवारी जळगाव जामोद येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये पटोलेंच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीकडून नाना पटोलेंचा कडाडून निषेध; नेत्यांचा एकेरी उल्लेख महागात
अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; प्राथमिक संशय प्रियकरावर

सध्या राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी मधील घटक पक्षांसोबत युती करणार नसल्याचे सांगत काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढले आणि सर्व जागांवर यशही मिळवेल असे सुतोवाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेळोवेळी केलेला आहे. दरम्यान मागील आठवड्यामध्ये नाना पटोले हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेगावात त्यांनी एका कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील दिग्गज नेत्यांचे एकेरी भाषेत उल्लेख करीत टीका टिप्पणी केली होती.

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील दुकाने बंद केली आता बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव दुकान बंद करायची आहे. अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे नाव न घेता केली होती या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पटोले यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे दरम्यान शनिवारी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटीलयांच्या नेतृत्वात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com