'सरकार हमसे डरती है, ED को आगे करती है'; WE सपोर्ट अजित दादा

'सरकार हमसे डरती है, ED को आगे करती है'; WE सपोर्ट अजित दादा
solapur ncp

सोलापूर : केंद्र सरकार राज्यातील आघाडी सरकारला लक्ष करत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. आम्ही सर्वजण दादांच्या पाठीशी ठामपणे उभे आहाेत. अजित पवार आगे बढाे अशा घाेषणांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चार हुतात्मा पुतळा चौकात केंद्र सरकार आणि भाजपच्या विराेधात जोरदार निदर्शने केली. ncp-supporters-in-solapur-protests-against-central-government-ajit-pawar-latest-marathi-news-sml80

solapur ncp
दिल्लीहून सदाभाऊंनी शेतक-यांसाठी आणली आनंदाची बातमी

यावेळी 'वुई सपोर्ट अजित दादा' अशा आशयाचे फलक पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलेले हाेते. 'केंद्र सरकार चले जाव','सरकार हमसे डरती है, इडी को आगे करती है' अशा घोषणांनी परिसर दणाणून साेडला. यावेळी समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तुम आगे बढाे हम तुम्हारे साथ है चा नारा दिला.

सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे solapur ncp शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हाेत असलेल्या अन्यायाबद्दल चीड व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.