दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादीच्या नेत्याची शिंदे गटावर टीका; म्हणाले,'दिल्लीचे खोके...'

दसरा मेळाव्याच्या निकालावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर जोरदार टीका केली.
eknath shinde and ncp
eknath shinde and ncp saam tv

चेतन व्यास

Shivsena Dasara Melava News : मुंबईच्या शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणी शिंदे गटाने परवानगी मागितली होती. दोन्ही गटांना मुंबई महापालिकेने (BMC) परवानगी नाकारल्यावर मुंबई उच्च न्यायलयात हे प्रकरण गेले होते. यावर आज उच्च न्यायलयाने उद्धव ठाकरे यांना दिलासा देत दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत परवानगी दिली. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटावर जोरदार टीका केली.

eknath shinde and ncp
अमित शहांबद्दल बोलताना विचार करा; अन्यथा..., भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा

'न्यायलायचा निकाल हा दिल्लीचे खोके घेऊन काही बोके हा दसरा मेळावा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. त्या बोक्यांना आता न्यायदेवतेने चपराक लावली आहे. सत्तासंघर्षावर असाच निर्णय सुप्रीम कोर्टाने देत खोके घेणाऱ्या बोक्याच्या हैदोसातून महाराष्ट्राची मुक्तता करावी, अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली.

मेहबूब शेख हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दसरा मेळाव्याच्या निर्णयावर बोलताना म्हणाले की, आज मुंबई उच्च न्यायलयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिली. एक नेता, एक मैदान आणि एक पक्ष हा दसरा मेळावा शिवसेनेची जी वर्षनुवर्षे परंपरा आहे. ही आता पुन्हा एकदा या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येईल. दसरा मेळाव्याला आडवा पडायचा प्रयत्न करत होते. दिल्लीचे खोके घेऊन काही बोके हा दसरा मेळावा होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. त्या बोक्यांना आता न्यायदेवतेने चपराक लावली आहे'.

eknath shinde and ncp
Dasara Melava: शिवाजी पार्कसाठी एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

'मुंबई उच्च न्यायलयाच्या खंडपीठानं जसं कायद्याला धरून लवकर निर्णय दिला तशीच अपेक्षा आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायलयाकडून आहे. शेड्युल दहा प्रमाणे कायद्याला धरून लवकर जर निर्णय दिला तर महाराष्ट्रात जी गद्दाराची टोळी आणी खोके घेणारे बोके यांनी जो हैदोस मांडला आहे. 'त्या हैदोसातून महाराष्ट्राच्या जनतेची लवकरच मुक्तता होईल'.

'मला खात्री आहे की हा दसरा मेळावा ऐतिहासिक आणी अभूतपूर्व दसरा मेळावा हा शिवसैनिक निश्चितपणे यशस्वी करतील. सर्व गद्दारांसाठी मोठी चपराक असेल,असेही मेहबूब शेख म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com