केंद्र सरकारच्या विरोधात मोहाडीत राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

केंद्र सरकारच्या विरोधात मोहाडीत राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर
मोहाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.

भंडारा ः केंद्र सरकारच्या अन्यायकारी धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. महागाईमुळे मोदी सरकारविरोधात सर्वसामान्यांच्या भावनांचाही भडका उडाला आहे.

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने मोहाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भंडारा-तुमसर महामार्गावर रास्ता रोको करून मोदी सरकारविरोधात निदर्शने केली. यामुळे या मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती.NCP agitation at Mohadi against the Central Government

मोहाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.
श्रीपाद छिंदमवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करा - सचिन खरात

केंद्र सरकारच्या अन्यायकारी धोरणाचा निषेधार्थ व गॅस दरवाढ कमी करणे, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करणे, खाद्य तेल व जळाऊ लाकडाचे भाव कमी करणे, धानाचे हमी भाव 2500 रुपये प्रति क्विंटल करणे, शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्रसामुग्री तीन टक्के राष्ट्रीयकृत बँकांकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात यावे आदी मागण्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्या.

मोहाडी येथील बसस्थानक चौकात एक दिवसीय धरणे व चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकारवर या वेळी ताशेरे ओढण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.NCPs agitation at Mohadi against the Central Government

धर्माचे राजकारण करून भाजप सत्तेवर आली होती. परंतु त्यांनी दिलेले कोणतेच आश्वासन पूर्ण केलेले नाही. दिवसेंदिवस इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या सरकारला जाग आणण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.

- राजू कारमोरे, आमदार, राष्ट्रवादी.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com