भंडाऱ्यात भाजपसोबत काँग्रेसची नव्हे राष्ट्रवादीची युती; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

'काँग्रेसने भाजपसोबत युती किंवा आघाडी केली नाही, उलट भाजपला खिंडार पाडलं.'
भंडाऱ्यात भाजपसोबत काँग्रेसची नव्हे राष्ट्रवादीची युती; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
NCP/BJPSaam TV

रश्मी पुराणिक -

मुंबई : देशात महागाईच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षांकडून भाजपविरोधी भूमिका घेतली जात आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते भाजपविरोधी आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच भंडाऱ्यात काँग्रसने (Congress) जिल्हा परिषदेत भाजपच्या (BJP) गटासोबत युती केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या शिवाय ही युती झालीचं कशी आणि का केली अशी टीका देखील काँग्रेसवर केली जात होती. या सर्व पार्श्वभूमिवर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

ते म्हणाले, २१ जिल्हा परिषादेच्या सदस्यांसह काँग्रेस हा भंडारा जिल्हा (Bhandara) परिषदेतील सर्वात मोठा पक्ष आहे. या जिल्हा परिषदेतील भाजपचे ६ सदस्य फुटून भाजपमध्ये आले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे भंडाऱ्यात काँग्रेसचा सदस्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसल्याचं लोंढे यांनी सांगितलं. शिवाय काँग्रेसने भाजपसोबत (BJP) युती किंवा आघाडी केली नाही. उलट काँग्रेसने भाजपलाच खिंडार पाडलं असल्याचंही ते म्हणाले.

NCP/BJP
उद्धव ठाकरे, तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत : राज ठाकरे

शिवाय भंडारा जिल्हा आणि गोंदीया जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची (BJP And NCP) आघाडी झाली असल्याचं त्यांनी सांगितंलं.

दरम्यान, भंडाऱ्यात या निवडणुकीत भाजपचे १२, काँग्रेस २१, राष्ट्रवादी काँग्रेस १३, बसपा १ , शिवसेना १, वंचित बहुजन आघाडी १ आणि अन्य पक्षाचे ३ सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान भंडारा जिल्हा परिषदेत भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याच्या चर्चा सुरु होत्या मात्र आता काँग्रेस प्रवक्तांनी या चर्चांना पुर्ण विराम दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.