राष्ट्रवादीचे नाराज नेते भाजपत, निवडणुकीसाठी गोळाबेरीज

पुणे - राष्ट्रवादीचे शांताराम भोसले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपत प्रवेश केला.
पुणे - राष्ट्रवादीचे शांताराम भोसले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपत प्रवेश केला.

खेड ः आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. या प्रदेशात राष्ट्रवादीला कमकुवत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. खेड तालुक्यातील एका मातब्बर नेत्याला त्यांनी पक्षप्रवेश देत विजयाचे अभियान सुरू केले आहे.

खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर रामराम करीत माजी तालुकाध्यक्ष शांताराम भोसले भाजपात दाखल झालेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे. NCPs Shantaram Bhosale joins BJP

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांना सलग दहा वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत यश मिळाले होते. मात्र, त्यांना पदावरून हटविल्यानंतर खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपयशाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता भाजपाने नव्याने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. बेरजेच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे माजी तालुकाध्यक्ष शांताराम भोसलेंना भाजपने दार उघडे केले आहे. भाजपची ही नवी खेळी किती प्रभावी ठरते हे काळच ठरवेल.

विधानसभा निवडणुकीत भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभावाचा सामना करावा लागला. मात्र, येणारी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना सूक्ष्म नियोजन करीत पक्ष प्रवेशाचे गणित मांडायला भाजपाने सुरूवात केली आहे. भोसले यांचा पक्षप्रवेश हे त्याचेच द्योतक असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

पुणे येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भोसले यांना पक्षप्रवेश देण्यात आला. यावेळी माजी मंत्री संजय बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख उपस्थित होते.NCP's Shantaram Bhosale joins BJP

भोसलेंना लवकरच मोठे पद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तालुकाध्यक्ष असताना खेड तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये भोसले यांचा असणारा दांडगा जनसंपर्क लक्षात घेत भाजपाने गोळाबेरीज सुरू केलीय. पुढील काळात त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By- Ashok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com