नंदुरबार, शहरातून जवळपास साडेचार लाखांचा तंबाखू युक्त गुटखा जप्त!
नंदुरबार, शहरातून जवळपास साडेचार लाखांचा तंबाखू युक्त गुटखा जप्त!दिनू गावित

नंदुरबार, शहरातून जवळपास साडेचार लाखांचा तंबाखू युक्त गुटखा जप्त!

अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नंदुरबार शहर पोलिसांची संयुक्त कारवाई...

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या तंबाखू युक्त गुटखा पदार्थाचे मोठ्याप्रमाणावर तस्करी केली जाते. परंतु पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग केवळ नावाला कारवाई करतात. नंदुरबार शहरातील अमर टॉकीज परिसरातील अनिल चौधरी यांच्या किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासन व नंदुरबार शहर पोलिसांनी छोटेखानी कारवाई केली. या कारवाईत तंबाखूयुक्त विमल गुटख्याचा जवळपास साडेचार लाखांचा साठा जप्त केला.

हे देखील पहा :

किराणा दुकान मालक अनिल चौधरी यांच्याकडे तपासणीत महाराष्ट्रात बंदी असलेले तंबाखूयुक्त विविध प्रकारच्या गुटखा पाऊच चा साठा मिळून आला. सदर गुटखा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणून अनिल चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सूरु असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे. परराज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी करून खुलेआम बाजारात विकणाऱ्या वर प्रशासन का कारवाई करत नाही असा प्रश्न विचारल्यावर आमच्याकडे पर्याप्त मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगितले.

नंदुरबार, शहरातून जवळपास साडेचार लाखांचा तंबाखू युक्त गुटखा जप्त!
बापरे...एकाच झाडावर आढळले तीन विषारी कोब्रा! पहा Viral Video

खरतर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग मोठ्या गुटखा तस्करांवर कारवाई न करता पाठबळ देत असल्याचे चित्र आहे. सदर कारवाई सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आबा पवार, अविनाश दाभाडे यांच्यासह नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे प्रतापसिंह मोहिते, प्रवीण पाटील, मुकेश पवार बटू धनगर, राहुल पांढारकर या पथकाने कारवाई केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com