
ज्ञानेश्वर हिंगोलीकर
पुणे : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय झाला आहे. भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याने ओडीसासह संपूर्ण देशभरात जल्लोष केला जात आहे. पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आनंदोत्सव (celebration of tribal student) साजरा करण्यात आला. याठिकाणी आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 400 आदिवासी विद्यार्थी आणि ईश्वर पूरम प्रकल्पांतर्गत अरुणाचल प्रदेश व नागालँडमधील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी पेढे वाटून, ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून आणि पत्र लिहून द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा (Greeting to Draupadi Murmu) दिल्या व राष्ट्रपती झाल्यानिमित्त त्यांचे अभिनंदन केले.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देताना व त्यांचे अभिनंदन करतानाच त्यांच्या भेटीची इच्छा देखील व्यक्त केली आहे. द्रौपदी मुर्मू आदर्श महिला असून त्या आमच्या प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही देशाची व समाजाची सेवा करायची आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
देशाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची घटना आहे. त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांचे पोस्टर उंचावत, एकमेकांना पेढा भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य सादर करीत द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे,शिक्षण संचालक नरहरी पाटील,नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य पी शोफीमोन, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य देनसिंग,लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी,विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.