Navi Mumbai Water Supply: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा; 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

New Mumbai Water Issue: जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
New Mumbai Water Supply
New Mumbai Water SupplySaam TV

नवी मुंबईतील पाणीपुरवाठा बंद:

नवी मुंबईकरांसाठी पाण्याबाबत महत्वाची बातमी समोर आलीये. नवी मुंबईतील काही शहरांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशीच जास्त पाण्याचासाठा करून ठेवावा असं आवाहन सिडकोमार्फत करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

New Mumbai Water Supply
Hyderabad Restaurant Crime: बिर्याणीसोबत दही मागितल्याने हत्या; रेस्टॉरंटमधील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

'या' शहरांमध्ये पाणीपुरवाठा बंद राहणार?

खारघर, तळोजा, उलवे, द्रोणागिरी, जेएनपीटीत येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. हेटवणे धरणातून नवी मुंबईला होतो पाणी पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.

सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिनीवरील देखभाल तसेच दुस्स्कीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा येथे पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून, या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

New Mumbai Water Supply
Vasai Crime News: विवाहबाह्य संबंधाचं बिंग फुटलं; पत्नीच्या मदतीने नवऱ्याने प्रेयसीला संपवलं

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com