
Dhule News : धुळ्यात थंडीचा जोर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना देखील पालिका प्रशासनातर्फे पहाटे चार ते साडेचार वाजता पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात हाेता. कडाक्याच्या थंडीत नागरिकांना पाणी भरणे शक्य हाेत नव्हते. नागरिकांची मागणी साम टीव्हीने प्रसारित करुन पिण्याच्या पाण्याची वेळ धुळे (dhule) पालिकेने बदलावी यासाठी वाचा फाेडली. त्याची दखल पालिकेने घेतली.
गेल्या काही दिवसांपासून नागरिक मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची वेळ बदलावी यासाठी मागणी करीत हाेते. परंतु त्यास पालिका दाद देत नव्हती. साम टीव्हीने कडाक्याच्या थंडीत ज्येष्ठांसह युवकांना (youth) पाणी भरावे लागत आहे असे वृत्त प्रसारित केल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. (Breaking Marathi News)
साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत अखेर पालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याच्या वेळेत बदल केला आहे. आता पहाटेची वेळ रद्द करण्यात आलेली आहे. नागरिकांना सकाळी आठ वाजल्यानंतर पालिका प्रशासनाने पिण्याचा पाण्याचा पुरवठा (Dhule Water Supply New Timing) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एकीकडे पाच ते सहा दिवसानंतर एकदाच पिण्याचा पाण्याचा पुरवठा (water supply) पालिका प्रशासनातर्फे धुळेकरांना केला जातो. त्यातही पहाटेच्या दरम्यान थंडीमध्ये पिण्याचे पाणी भरण्यासाठी नागरिकांना उठावं लागत हाेते. नव्या निर्णयामुळे साम टीव्हीचे नागरिकांनी आभार मानले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.