नांदेड जिल्ह्यात कुठे ढगफुटी तर कुठं पावसामुळं दिलासा..

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजवली येथे ढगफुटी सद्रश पाऊस झाला. काल झालेल्या या पावसामुळे गोंडजवली येथील माती बंधारे फुटला आणि शेतात पाणी शिरून जवळपास 50 एकर मधील खरडून गेल्यानं पिकाचं मोठं नुकसान झालं
नांदेड जिल्ह्यात कुठे ढगफुटी तर कुठं पावसामुळं दिलासा..
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजवली येथे ढगफुटी सद्रश पाऊस झाला- Santosh Joshi

नांदेड : जिल्ह्यातील किनवट Kinvat तालुक्यातील गोंडजवली येथे ढगफुटी सदृश पाऊस Rains झाला. काल झालेल्या या पावसामुळे गोंडजवली येथील माती बंधारे फुटला आणि शेतात पाणी शिरून जवळपास 50 एकर मधील खरडून गेल्यानं पिकाचं Crops मोठं नुकसान झालं. Nanded Districts Rains situation

तहसिलदार उत्तम कागणे यांनी तातडीने नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले. तलाठी, मंडळाधिकारी यांनी नुकसानीचा पंचनामा करत नुकसानीचा अहवाल तहसिलदारांकडे सादर केला आहे. खरीपाचं पिकं चांगलं येईल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढावलेय. आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.

हे देखिल पहा

दुसरीकडे आज नांदेड जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही पावसाची हजेरी लावली.या पावसामुळे खरीप पिकांना जिवदान मिळणार आहे तर दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासा देणारा आहे. जिल्हयात आतापर्यंत 95 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. मात्र, पावसाचा दिर्घकाळ खंड पडल्यानं अनेक भागात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. Nanded Districts Rains situation

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजवली येथे ढगफुटी सद्रश पाऊस झाला
वारीच्या इतिहासात प्रथमच संत तुकाराम महाराज मंदिरात पहिले गोल रिंगण संपन्न

मात्र, तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे कापुस, मुग, उडीद, सोयाबीन, तूर, हळद या पिकांना चांगला फायदा होत आहे. आणखी पावसाची आवश्यकता असून, जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात फारशी वाढ झाली नाही त्यामुळे जोरदार पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com