NIA ने ६ जणांना घेतले ताब्यात; माहीम दर्ग्याचे विश्वस्त खंडवानींची १३ तास चौकशी

मुंबईत एनआयएने २० पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले.
NIA ने ६ जणांना घेतले ताब्यात; माहीम दर्ग्याचे विश्वस्त खंडवानींची १३ तास चौकशी
NIA Saam Tv

मुंबई: आज सकाळपासून मुंबईत एनआयएने छापासत्र सुरु केले आहे. २० पेक्षा अधिक ठिकाणी एनआयएने (NIA) छापा टाकला. यानंतर पोलिसांनी सहा जाणांना ताब्यात घेतलं आहे. यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांच्यासह सलीम फ्रूट, समीर हंगोरा, अब्दुल कय्यूम शेख यांनाही आज सकाळी एनआयएने तब्बल १३ तास चौकशी केली आहे. (NIA Raids)

NIA
दाऊद इब्राहीमचा हस्तक सलीम फ्रुट 'एनआयए'च्या ताब्यात

माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांच्या मालमत्तांवरही छापेमारी केल्यानंतर खंडवानी यांना चौकशीसाठी एनआयएचे (NIA) कार्यालयात चौकशीसाठी आणले आहे. त्यानंतर आता भाजपच्या मोहित कंबोज यांनी सुहेल खंडवानी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचबरोबर कंबोज यांनी काँग्रेस नेत्यांसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबईत २० ठिकाणी 'एनआयए'चे छापे

मुंबईत एकुण २० ठिकाणी कारवाई झाल्याची माहिती आहे. त्यात छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. दाऊद टोळीच्या जवळचा व्यक्तींच्या घरावर छापे टाकले आहेत.(NIA Raids)

दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) जवळच्या व्यक्तींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली. ही कारवाई दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबंधीत आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

हे देखील पाहा

एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यावर ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे.

कोण आहे सलीम फ्रुट

सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुटला २००६ मध्ये युएई मधून भारतात पाठवण्यात आले होते आणि २०१० पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रुटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा आलीशान पारकर यांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात.(NIA Raids)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.