Akola Breaking: 25 नोव्हेंबरपर्यंत 'नाईट कर्फ्यू'

शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात कलम 144 जारी करण्यात आले असून 25 नोव्हेंबर रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे.
Akola Breaking: 25 नोव्हेंबरपर्यंत 'नाईट कर्फ्यू'
Akola Breaking: 25 नोव्हेंबरपर्यंत 'नाईट कर्फ्यू'Saam TV

अकोला : शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात कलम 144 जारी करण्यात आले असून 25 नोव्हेंबर रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दिले. आदेशात 25 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 25 नोव्हेंबर पर्यन्त रात्री दहा ते सकाळी पाच या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील.

काय म्हटलंय आदेशात-

1. कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील किंवा विभिन्न जाती धर्माच्या दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य, वक्तव्य करणार नाहीत व अफवा पसरविणार नाहीत.

2. जातीय भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमांव्दारे प्रसारीत करणार नाहीत, तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही व समाज माध्यमांचा गैर वापर करणार नाहीत.

3. कोणत्याही प्रकारचे रॅली, धरणे, मोर्चाचे किंवा कार्यक्रमाचे आयोजन करणार नाही.

4. निवडणुक प्रचार संदर्भात काही कार्यक्रम असल्यास यासदर्भात निवडणुक निर्णय अधिकारी यांचे परवानगी घेणे आवश्यक आहे. असे उपविभागीय अधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे. तर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू करून दिवसा जमाबंदीचे आदेश यापूर्वीच दिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com