निलंगा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा; आरोपींना अटक

निलंगा पोलिसांची कामगिरी
Latur Crime News
Latur Crime NewsSaam Tv

लातूर - जिल्ह्यातील पानचिंचोली येथे लातूर (Latur) ते जहीराबाद मार्गावर रोडच्या बाजूला नालीमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळून आले होते. त्यावरून पोलीस (Police) ठाणे निलंगा येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पैशाच्या व्यवहारावरून व त्याच्या सोबत असलेल्या अनैतिक संबंधा वरून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील पाहा -

तपासा दरम्यान मयताचे नाव भानुदास माळी असे असल्याचे त्याच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आले. मयत भानुदास हे एका महिला व पुरुषाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अमरनाथ किने यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पंढरपूर येथील एका महिलाच्या सहाय्याने भानुदास माळी यास पंढरपूर येथून सोबत घेऊन पानचिंचोली रोडवर गाडीमध्ये गळा आवळून खून केल्याचे सांगितले.

Latur Crime News
जखमी शाहरुख, चेहऱ्यावर बँडेज; 'जवान'चा टीझर प्रदर्शित

या माहितीवरून पोलिसांच्या तपास पथकाने सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशीसाठी निलंगा येथे आणले. चौकशी दरम्यान तिने तिचा मित्र अमरनाथ किने याच्या सहाय्याने भानुदास माळी याच्या सोबत असलेल्या पैशाच्या व्यवहारावरून व त्याच्या सोबत असलेल्या अनैतिक संबंधा वरून खून केल्याचे सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com