लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगला लंके-विखेंमध्ये सामना

लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगला लंके-विखेंमध्ये सामना

अहमदनगर : सध्या जिल्ह्याच्या राजकारणात खासदार सुजय विखे पाटील यांच्या रडारवर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे दिसते. विशेष करून कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि पारनेरचे आमदार नीलेश लंके. त्यांनी दोघांना टार्गेट केले आहे. आमदार लंके यांनीही कंबर कसल्याचे दिसते आहे. ही आगामी लोकसभेच्या लढाईची रंगीत तालिम मानली जात आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील घराण्याचा शक्यतो कोणी रोष पत्करत नाही. परंतु लंके यांनी त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला सुरूवात केली आहे. त्यांचे कार्यकर्तेही त्यांचीच री ओढत आहेत. लंके विखे पाटलांवर टीका करताना म्हणतात, विळद घाटातील रूग्णालयातील डिपॉझिट भरल्याशिवाय रूग्णांना प्रवेश देत नाहीत. त्यामुळे तुम्ही आमच्यावर टीका करू नये. वेळ पडली तर जिल्ह्यातील ताकद दाखवून देऊ, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना आमदार नीलेश लंके यांनी दिला.Nilesh Lankes allegations against Sujay Vikhe Patil

लोकसभा निवडणुकीपूर्वीच रंगला लंके-विखेंमध्ये सामना
कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आठवड्यात केली टोळी जेरबंद

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर (खावटी अनुदान) या योजनेंतर्गत तालुक्यातील पळशी येथे वनकुटे, तास, पळशी खडकवाडी, वडगाव सावताळ, देसवडे व मांडवे खुर्द गावांतील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना किराणा किट व अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार लंके म्हणाले, कोरोना काळात काहींनी दिखाऊपणा केला रेमडेसिव्हिरचे व्हिडिओ दिसले. मात्र, वाटप कुठे झाले तालुक्यातील काहींनी त्याचा काळा बाजार केला. विळदघाटातील सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख कोरोना बाधित झाला. खासदारांनी त्यालाही वा-यावर सोडले डिपॉझिट भरल्याशिवाय प्रवेश होणार नाही सांगितले त्यास आपल्या भाळवणी मधील कोविड सेंटर मध्ये मोफत उपचार देऊन बरे केले आमच्यावर टीका करताना सर्व बाबींचा विचार करून करावी वेळ पडल्यास आम्ही जिल्ह्यात किती सक्षम आहोत, हे दाखवून देऊ.

आमच्याकडे शिक्षण संस्था, रूग्णालय, कारखाना नसेल मात्र, प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येत आहे. हे विसरू नका. ज्या वेळी कोरोनाबाधित नागरिकांना बाजूला टाकण्यात यायचे. त्या रूग्णांना मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी मानसिक आधार दिला. चांगल्या कामावर टीका होणारच. मात्र, ते आम्ही थांवणार समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेतच राहणार, असेही लंके म्हणाले.

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांच्या कामाची छाप देशभरात पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा बराच मोठा लोकसंपर्क आहे. जिल्हाभरात त्यांचे चाहते आहेत. सोशल मीडियातही बरेच फॉलोअर्स तयार झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊ शकते. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात ते तगडे उमेदवार ठरू शकतात. एकंदरीत आरोप-प्रत्यारोपांची उठलेली राळ पाहता, तसेच दिसते आहे, असे निरीक्षण पत्रकार सनी सोनावळे यांनी नोंदवले. Nilesh Lankes allegations against Sujay Vikhe Patil

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com