कोरोनात बिळात लपले, आता बाहेर निघाले!

कोरोनात बिळात लपले, आता बाहेर निघाले!
आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी

मार्तंड बुचुडे

पारनेर ः विधानसभेचे माजी उपसभापती आमदार विजय औटी यांनी धोत्रे येथे एका उदघाटन प्रसंगी मी सर्वांचा बाप आहे. कोणी कामात खो घालण्याचा प्रयत्न करू नये. गत आठवड्यात विविध उदघाटनावेळी आपण आमदार असतो तर किमान ५० टक्के जीव वाचविले असते तसेच तरूण पिढी बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे, असेही औटी म्हणाले होते. त्यास आमदार नीलेश लंके यांनी मी बाप नाही तर जनतेचा सेवक आहे. शेवटपर्यंतच जनसेवकच राहील, असे टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. Nilesh Lanks reply to Auntys criticism

करंदी येथील एका विकासकामाच्या व माजी सभापती राहुल झावरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. लंके यांनी औटी यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. लंके पुढे म्हणाले, मी समाजकारण व राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे. मी जर स्वतःला आमदार समजू लागलो, तर त्या दिवसांपासून माझी जनतेशी असलेली नाळ तुटलेली असेल.

आमदार नीलेश लंके व माजी आमदार विजय औटी
लग्नकल्लोळ! सुहागरात्री बाहेरून कडी लावून पळालेल्या वधूला अटक

कोरोनाच्या महाभयंकार संकटात जी माणसे लपून बसली होती. ती आता बिळातून बाहेर पडली आहेत. ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा जीव वाचविता आले नाहीत. कार्यकर्त्यांचे फोनही घेतले नाहीत, मदत तर दूरच राहिली, ते सामान्य जनतेसाठी काय करणार, असाही सवालही केला.

कोविड सेंटर उभारून सर्वसामान्य जनतेला आधार देऊन सुमारे १७ हजार रुग्णांना कोरोनामुक्त केल्याचे मला समाधान वाटते. जर कोरोना सेंटर सुरू केले नसते तर या लोकांना प्रत्येकी किमान एक लाख रूपये खर्च आला असता. मी मतदार संघात सुमारे शंभर कोटींहून अधिक रूपयांची विकास कामे मंजूर करून आणली. त्यांचे उदघाटने करणे व नारळ फोडणे यासाठीसुद्धा मला वेळ नाही. काहींना फक्त नारळ फोटण्याची हौस असते, ती त्यांनी करून घ्यावी. मला त्यांचे काहीच देणे-घेणे नाही. संकटाच्या वेळी माजी आमदार नंदकुमार झावरे माझ्या पाठिशी ऊभे राहिले. ते उपकार मी कधीच विसरणार नाही. झावरे यांचे सहकारात मोठे काम आहे. Nilesh Lanks reply to Auntys criticism

या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहूल झावरे, आत्मा समितीचे अध्यक्ष अॅड.राहुल झावरे, मारुती रेपाळे, सरपंच नामदेव ठाणगे, किरण ठुबे, रावसाहेब ठाणगे, जितेश सरडे, टाकळी ढोकेश्वरचे सरपंच बाळासाहेब खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, लखन ठाणगे, शरद गोरे, महेंद्र गायकवाड, शारदाताई गांगड, सोनाली चौधरी, मंगल चौधरी, मनिषा ठाणगे, जितेंद्र उघडे, सुनीता औटी, सुनील ठाणगे, भाऊसाहेब पिंपरकर आदी उपस्थित होते‌.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com