
Nilesh Rane News : कणकवलीत (Kankavli) मंगळवारी झालेला राडा हा पूर्वनियोजित हाेता. या घटनेत गोट्य सावंत (gotya sawant) यांचा जीव गेला असता. पाेलिस या घटनेचा तपास करीत असल्याने यावर जादा बाेलणे उचित ठरणार नाही असे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कणकवलीत झालेल्या मारामारीवर मत व्यक्त केले. दरम्यान यावेळी वैभव नाईक (Vaibhav Naik) हा पळपुटा आमदार असल्याचे राणेंनी एका प्रश्नावर उत्तर देताना नमूद केले.
कणकवलीतील कनेडी गावात मंगळवारी भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट शिवसेना पदाधिकाऱ्यांत राडा झाला. यामध्ये शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला व भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. त्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला. सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याने आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) हे गावात येऊन भाजप कार्यकर्त्यांशी दाेन हात करण्याच्या तयारीत दिसले. पाेलिसांनी (Police) वेळीच आमदार वैभव नाईक यांना राेखले.
याबाबत माजी खासदार निलेश राणेंना माध्यमांनी छेडले असता ते म्हणाले वैभव नाईक याच्याकडे कार्यकर्ते नाहीत. ज्या वेळेस त्याला दिसला आता समाेर काेणी नाही. त्यावेळी ताे दांडा घेऊन आला. त्याला समजले पाेलिस थांबवणार त्यामुळे ताे दांडा हातात घेऊन आला. (Maharashtra News)
दाेन पावलांवर पाेलिसांनी त्याला ढकललं. खरंतर कणकवलीतील राड्यात कट रचला गेला. या घटनेत गोट्या सावंत यांचा जीव गेला असता. हा साधा सूधा कट नाही. त्यावर पाेलिस तपास सुरु असल्याने सध्या जास्त बाेलत नाही. परंतु वैभव नाईक पळपुटा आमदार आहे. ताे 2024 नंतर आमदार दिसणार नाही अशी टिप्पणी निलेश राणे यांनी केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.