Nilesh Rane News: उद्धव ठाकरे बारसुत येतील तेव्हा काहीतरी मोठं घडवण्याचं षडयंत्र; निलेश राणेंचा मोठा दावा

Nilesh Rane on Barsu Refinery : उद्धव ठाकरे बारसुत येणार आहेत, त्या दिवशी काहीतरी मोठं घडवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा दावा निलेश राणेंनी केला आहे.
Nilesh Rane on uddhav thackeray
Nilesh Rane on uddhav thackeraysaam tv

>> विनायक वंजारे

Nilesh Rane on uddhav thackeray: भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा दावा केला आहे. येत्या 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसुत येणार आहेत, त्या दिवशी काहीतरी मोठं घडवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

निलेश राणे म्हणाले, बारसुमध्ये काही दिवसांपासून जे घडतंय ते सांगण्यासाठी मी ही पत्रकार परिषद बोलावली आहे. जनतेला आणि अधिकाऱ्यांना या गोष्टी कळाव्यात हा यामागचा उद्देश आहे. बारसुमध्ये बोअरवेल मारण्याचे काम सुरू आहे, 6 तारखेला उद्धव ठाकरे तिथे येणार असल्याचे कळले. त्यासाठी मागच्या दरवाजाने मोठी तयारी सुरू आहे अस मला कळलं, असे ते म्हणाले.

Nilesh Rane on uddhav thackeray
Saam Survey: मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार भाजपसोबत जातील? सर्वपक्षीय समर्थकांना काय वाटतं?

तसेच, जिलेटीन स्टिक गोळा करण्याचे काम काही लोक करत आहेत. ते कशासाठी मला माहित नाही. ज्यांना 6 तारखेला काही घडवायचंय ते लोक असा प्रयत्न करता आहेत. ही बाहेरची लोकं आहेत असा दावा करत निलेश राणे यांनी याची माहिती मी उद्या पोलिसांना आणि देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे सांगितले.

निलेश राणे म्हणाले, बाहेरच्या लोकांना 6 तारखेला वातावरण चिघळवायचं आहे. हे बाहेरचे लोक आहेत, यात उद्धव ठाकरेंचा काही संबंध नाही. हा विषय फार गंभीर आहे. म्हणून मी पालकमंत्र्यांना सांगणार आहे. जर हा विषय निलेश राणेंना कळतो, याचा अर्थ काही तरी घडतंय म्हणूनच ना.

जिलेटीन स्टीकचा हा एक विषय माझ्या कानावर आला आहे, अजूनही काही विषय असू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. असं मटेरियल एका आंदोलनासाठी इथे यायला लागलं तर हा फार गंभीर विषय आहे. काहीतरी कट आहे, त्याचा शोध पोलिसांनी आता घ्यायला हवा अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

Nilesh Rane on uddhav thackeray
Saam Survey: शरद पवारांचा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे? समर्थकांचा कल समोर

पुढे बोलताना ते म्हणाले, जैतापूर प्रकल्प आणण्यासाठी आम्ही सर्व पणाला लावलं होतं. उद्धव ठाकरे बारसुला चिघळवायला येत असतील तर समर्थन किती मोठ्या प्रमाणात आहे हे दाखवण्यासाठी समर्थन मोर्चा काढावा लागेल असेही निलेश राणे म्हणाले. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंसारखी बाहेरची लोक बारसुच वातावरण बिघडवत आहेत. विरोध करायचा आणि ठेके मिळवायचा अशी उद्धवजींची पद्धत आहे असा आरोपीही त्यांनी यावेळी बोलताना केला. विरोध केल्यास हा चौथा प्रकल्प जाईल. हा प्रकल्प गेला तर यानंतर कोकणात 5 कोटींचा ही प्रकल्प येणार नाही, असेही ते म्हणाले. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com