मुख्यमंत्र्याची काही तर ठेवली पाहिजे म्हणून आज केलं; राणे
nilesh rane uddhav thackeray

मुख्यमंत्र्याची काही तर ठेवली पाहिजे म्हणून आज केलं; राणे

कुडाळ : शिवसेनेत खूप माेठी खदखद आहे. आगामी काळात सेनेला आणखी माेठा झटका देणार आहाेत. हा तर फक्त ट्रेलर हाेता. सिनेमा अजून बाकी आहे. आम्ही २४ तास काम करणारी लाेक आहाेत. एकही दिवस आम्ही आराम करीत नाही राहूल गांधींसारखे असे ट्विट निलेश राणे यांनी करुन शिवसेना आणि काॅंग्रेसला आव्हान दिले आहे. nilesh-rane-uddhav-thackeray-shivsena-three-panchayat-samiti-members-entered-into-bjp-kokan-news-sml80

निलेश राणेंच्या उपस्थित कुडाळ तालुक्यातील शिवसेनेच्या माजी सभापतींसह तीन प्रमुख पंचायत समिती सदस्यांनी आज (रविवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यावरुन राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंवर आणि काॅंग्रेस नेत्यांवर टीका केला. सदस्यांच्या पक्ष प्रवेशाचे ट्विट राणेंनी केले आहे. त्यात देखील त्यांनी शालजाेडीतून मुख्यमंत्री ठाकरेंना nilesh rane uddhav thackeray लक्ष्य केले आहे.

nilesh rane uddhav thackeray
शरीरसुखास विराेध; पत्नी दिशा ठाकरेचा संताेषने केला खून

मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर जाऊन २४ तास होत नाही की शिवसेनेचे तीन विद्यमान पंचायत समिती सदस्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. खरं तर हा प्रवेश आम्ही काल घेणार होतो पण मुख्यमंत्र्याची काही तर ठेवली पाहिजे म्हणून आज प्रवेश झाला असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

ते म्हणाले खूप माेठी खदखद शिवसेनेत आहे. आगामी काळात आणखी माेठे झटका देणार आहाेत. हा तर फक्त ट्रेलर हाेता. सिनेमा अजून बाकी आहे. इंटरव्हलपर्यंत काय करताे पहा असे निलेश राणे यांनी नमूद केले. उद्या कुडाळ-मालवणच्या सेनेच्या आमदाराचे डिपाॅझिट जप्त करु असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे. आम्ही २४ तास काम करणारी लाेक आहाेत. एकही दिवस आम्ही आराम करीत नाही राहूल गांधींसारखे असेही राणेंनी नमूद केले. दरम्यान राणे यांनी पंचायत समिती सभापती राजन जाधव आणि सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू या सदस्यांचे भाजपात स्वागत केले.

दरम्यान सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचं उदघाटन झाल्यानंतर निलेश राणे यांनी एक ट्विट करुन राणे साहेबांनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली असे म्हटलं. ते लिहितात आज विमानतळाचे उद्घाटन झालं. मुख्यमंत्री आले आणि गेले, डायलॉग मारायचा प्रयत्न केला पण ज्यांना भाषण जमत नाही ते डायलॉग काय मारणार. मुख्यमंत्री विकासात्मक बोलतील अशी अपेक्षा होती पण नेहमीप्रमाणे फालतू भाषण. राणे साहेबांनी व्यासपीठावरून राणेंची ताकद दाखवून दिली.

Related Stories

No stories found.