BJP MLA Fraud: भाजप आमदारांना गंडवणारा आरोपी प्रत्यक्षात बारावी नापास! तिहार जेलचीही खाल्लीये हवा

Niraj Singh Rathore Case : आरोपी निरज सिंग राठोड याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून केला त्याच्या चौकशीतून आणखी काही आमदारांनी नावं पुढे येण्याची शक्यता आहे.
Niraj Singh Rathore Fraud BJP MLA
Niraj Singh Rathore Fraud BJP MLA saam tv

Niraj Singh Rathore Fraud BJP MLA : भाजप आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून कोट्यवधींना गंडवणारा आरोपी बारावी फेल आणि तिहार जेल रिटर्न असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी निरज सिंग राठोड याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून केला त्याच्या चौकशीतून आणि मोबाईलमधील माहितीवरून देशातील आणखी काही आमदारांनी नावं पुढे येण्याची शक्यता आहे. निरजसिंह राठोडला अहमदाबादच्या मोरबी येथून नागपूरमध्ये आणले आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा खोटा आवाज काढून भाजप आमदारांकडे मंत्रिपदासाठी पैशांची मागणारा आरोपी निरज सिंग राठोड हा बारावी फेल आणि तिहार जेल रिटर्न आहे. आरोपी निरजवर यापूर्वी दिल्लीत फसवणुकी अनेक गुन्हे दाखल आहेत. निरज सिंग राठोडची रवानगी पाच दिवसांसाठी पोलीस कोठडी करण्यात आली आहे. पोलीस तपासात आणखी काही आमदारांची नावं पुढे येण्याची शक्यता आहे.

Niraj Singh Rathore Fraud BJP MLA
Amol Kolhe On Sharad Pawar: 'पवारसाहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण', अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभेचा चेंडू टाकला शरद पवारांच्या कोर्टात

जे पी नड्डा यांचा सहायक असल्याचा बनाव करणाऱ्या निरज सिंग राठोडची पोलीस कसून चौकशी करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील सहा आमदारांकडे त्याने पैशाची मागणी केली होती. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना निरजचा फोन आला होता. (Latest Political News)

Niraj Singh Rathore Fraud BJP MLA
Pune PMC Recruitments: पुणे महापालिकेत ३२० जागांसाठी भरती! जून- जुलैमध्ये होणार परिक्षा; जाणून घ्या संपूर्ण माहिती..

राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार असून मंत्रिपद हवे असेल तर पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपयांची त्याने आमदारांकडे केली होती. आमदार कुंभारे यांनी पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. यानतंर पोलिसांनी अहमदाबादच्या मोरबी येथून निरज सिंह राठोड याला ताब्यात घेतलं. त्याची चौकसी केली असता आरोपीने देशभरातील अनेक आमदारांकडे पैसे मागीतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com