Nitesh Rane : '...तर आमचे हात कोणी बांधले नाहीत'; कर्जतमधील 'त्या' प्रकरणावरून नितेश राणे आक्रमक

उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, या सारखाच प्रयत्न ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडल्याचा आरोप नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.
nitesh rane
nitesh rane saam tv

रश्मी पुराणिक

मुंबई : नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे कर्जतमध्ये एका युवकावर हल्ला झाल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. उदयपूरनंतर अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांना समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, या सारखाच प्रयत्न ४ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात घडल्याचा आरोप नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. (Nitesh rane News )

nitesh rane
Shivsena Vs Eknath Shinde | खरी शिवसेना नेमकी कोणाची? CM एकनाथ शिंदेंच्या ट्विटने पुन्हा चर्चेला उधाण

कर्जतमध्ये एका प्रतिक पवार नामक युवकाला बारा ते चौदा जणांकडून मारहाण झाली. प्रतिक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रतिकवर हल्ला झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत सदर घटनेवरून गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, 'प्रतिक पवार नावाचा एक युवक अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये जात असताना दहा ते पंधरा जणांनी थांवबलं. नुपूर शर्मा यांचा डिपी ठेवतो. हिंदू म्हणून आवाज करतो. त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. सदर युवकास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. त्याला ३५ टाके पडले असून युवक मृत्यूशी झुंज देत आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

'हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. नुपूर शर्मा विषय बंद झाला आहे. पण वारंवार हल्ला होत असेल, तर आमचे हात कोणी बांधले नाहीत. कर्जत प्रकरणातील मुख्य आरोपी पकडले गेले नसून ते फरार आहेत. त्या आरोपींना पोलिसांनी अटक करावी. सदर आरोपींवर कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी केला.

nitesh rane
चिंताजनक : एकाच महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीसह ३ तरुण बेपत्ता

'आता राज्यात महाविकास आघाडी सरकार नाही. आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक नाही. आता टार्गेट केलं तर जशास तसे उत्तर देऊ. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानावर चालतो, देशात शरिया कायदा लागू नाही. या प्रकरणी 'एनआयए' चौकशी करायची मागणी करणार आहे. त्या युवकाला भेटायला जाणार आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com