Aditya Thackeray जरा सुधर ! आज दगडी खाताेयस, उद्या चप्पला खाशील; पाहा Nilesh Rane काय म्हणाले

माजी खासदार निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंसह अंबादास दानवेंवर साधला निशाणा.
Nilesh Rane, Aditya Thackeray
Nilesh Rane, Aditya Thackeraysaam tv

- विनायक वंजारे

Nilesh Rane On Aditya Thackeray : आदित्य ठाकरे (aditya thackeray latest marathi news) सारखा बोगस भंपक माणूस महाराष्ट्रात (maharashtra) दुसरा नाही. दगडफेकीचा ड्रामा तयार केला. स्वतःच्या लोकांना दगड मारायला लावले. झेड प्लस संरक्षणासाठी हे नाटक केल्याची टीका माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाहनावरील दगडफेकीवरुन केली आहे.

Nilesh Rane, Aditya Thackeray
Kankavli News : पहाटेच्या सुमारास शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांना अटक; वैभव नाईकांचा शाेध सुरु

निलेश राणे यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले अंबादास दानवेंच्या (ambadas danve) जिल्ह्यात त्यांचा नेता दगड खातो याची त्यांना लाज वाटायला पाहिजे. खरंतर दानवेंनी राजीनामा द्यायला हवा असे राणेंनी नमूद केले. वरून जर बाळासाहेब (Balasaheb Thackeray) बघत असतील की आपला नातू (aditya thackeray)दगडी खातोय तर वरून तुमच्यावर चप्पला फेकतील अशी टिप्पणी राणेंनी केली.

Nilesh Rane, Aditya Thackeray
kolhapuri Chappal : ...अन् आरोपांच्या पिंजऱ्यात अडकलेली कोल्हापुरी चप्पल मुक्त झाली, जाणून घ्या गोष्ट एका खटल्याची!

आदित्य ठाकरे आता दगडी खातोयस, खोटं बोलायचं थांबव नाहीतर चपला खाशील असा निशाणा निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर साधला. दरम्यान राणेंनी ट्विट करुन आदित्य इतका बदमाश आहे की स्वतःच्या हितासाठी तो कोणालाही विकू शकतो. आजोबांचा पक्ष यांनी रसातळाला नेला, खरा राग सगळ्यांचा ह्याच्यावर आहे. तरी हा निर्लज्ज्यासारखा फिरत असतो. चौकशीत माहिती पडेल हा हल्ला यानेच घडवून आणला आहे, स्वतःचं संरक्षण वाढवण्यासाठी, हा एक नंबर नीच आहे असेही ट्विटमध्ये नमूद केेले आहे.

आदित्य सारखा घाबरट आणि पुळचट दुसरा नाही, अरे तुला संरक्षणाची एवढी भीती वाटते तर घरातून बाहेर का पडतो. स्वतःहून हल्ला करायला लावायचा आणि मग पोलीस संरक्षण वाढवून मागायचं. (Maharashtra News)

Nilesh Rane, Aditya Thackeray
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा मोठा दावा

तुम्ही ठाकरे ना मग तुम्हाला पोलीस (police) का लागतात? असा सवाल देखील राणेंनी केला आहे. दरम्यान अंबादास दानवे यांना राणेंनी कालीचरण संबाेधित त्यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. विराेधी पक्ष नेते असून त्यांच्या पक्षातील आमदारावर दगडफेक हाेते कमाल आहे असे राणेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com