...तर आजची सकाळ खराब झाली नसती; नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत.
Nitesh Rane, Sanjay Rane
Nitesh Rane, Sanjay RaneSaam Tv

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग - आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीची (ED) चौकशी अजुनही सुरू आहे. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी मार्फत 3 वेळा नोटीस देण्यात आली होती. मात्र या महाशयांनी तिन्ही वेळा वेगवेगळी करणे दिली आणि पळ काढला संजय राउत हे पळकुटे व्यक्ती आहेत.

हे देखील पाहा -

तुम्ही जर काही केलं नसेल पत्रा चाळ घोटाळ्यात तुमचा काही सबंध नसेल तर तुम्ही तीन तीन वेळा ईडी चौकशी का चुकवता बाळासाहेबांची शपथ घेण्यापेक्षा जर तुम्ही इडीला सत्य सांगितलं असत तर आजची सकाळ खराब झाली नसती. तुम्ही दररोज येऊन महाराष्ट्राची सकाळ खराब करत होता आज तुमची सकाळ खराब झाली स्वप्ना पाटकर च्या ऑडिओ क्लिप मध्ये ती जमीन माझ्या किंवा प्रवीण राऊत याच्या नावावर कर असे संजय राऊत सांगत आहेत.

Nitesh Rane, Sanjay Rane
संजय राऊतांच्या निवासस्थानी ईडी धाडीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

तर मग आता आरोप सिद्ध करायची गरज आहे का? संजय राऊत हे शरण जाणार नाही असे म्हणत आहेत मात्र ही घाण कोणत्याही पक्षाला नको आहे. अशी टिकाही नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com