खरंतर आज महाराष्ट्रात बेईमान दिवस साजरा झाला पाहिजे : राणे

आजच्या दिवशी राज्यात शांतता पसरली आहे.
nitesh rane
nitesh raneSaam Tv

सिंधुदुर्ग : आजचा दिवस हा बेईमान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकराला दाेन वर्ष पुर्ण झाल्याबद्दल उपहास्तमक टीका केली. महाविकास आघाडीला दाेन वर्ष आज (रविवार) पुर्ण झाली आहे. त्यावर राणे यांनी महाराष्ट्रात काेणतेही चांगलं कार्य न करणा-या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेची मन की बात समजून घ्यावी असे नमूद केले आहे.

nitesh rane
४० हजार रूपये भरण्यासाठी नसल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

नितेश राणे nitesh rane म्हणाले २८ नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा. हिंदुत्वाशी बेईमानी, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी, स्वतःच्या वडिलांच्या (स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे) विचारांशी बेईमानी, शेतकरी, कामगार सगळ्यांशी बेईमानी करून या ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रतील जनतेचा कौल समजून घ्या, सरकार बरखास्त करा आणि निवडणूकीला सामोरे जा. मग जनतेच्या मनात काय आहे हे मतदानाच्या माध्यमातून तुम्हांला दिसेल असे राणेंनी महाविकास आघाडीस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून नमूद केले.

लाेकाभिमुख सरकार असते तर जनतेने आज जल्लाेष केला असता. त्यांचा उत्साह दिसला असता. आजच्या दिवशी राज्यात शांतता पसरली आहे. जसे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान माेदींनी शेतकरी कायदे मागे घेतल्यानंतर लाेकांचा विजय झाला. लाेकांचा विचारांचा विजय झाला अशी भावना व्यक्त केली हाेती. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी देशाची मन की बात आेळखली. तुम्हांला महाराष्ट्राची मन की बात समजून घ्यायची असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामाेरे जा असेही राणेंनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com