Nitesh Rane On Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाचा अपमान थांबवा, तुम्ही शिवसेना नाही, शिवसेना उ.बा.ठा. म्हणा अन्य काहीही : नितेश राणे

निवडणूक आयोगामध्ये तक्रार करा असे मुख्यमंत्र्यांना विनंतरी करणार असल्याचे नितेश राणेंनी नमूद केले.
nitesh rane, uddhav thackeray, sanjay raut,
nitesh rane, uddhav thackeray, sanjay raut,saam tv

- विनायक वंजारे

Nitesh Rane On Sanjay Raut : शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ साहेबांजवळ आहे. ज्या पद्धतीने संजय राऊत (sanjay raut) उद्धव ठाकरे (uddhav thackeray) असतील किंवा ठाकरे गटाचे लोक वारंवार शिवसेना शिवसेना (shivsena) बोलतात हा निवडणूक आयोगाचा अपमान आहे असे भाजप आमदार नितेश राणेंनी (nitesh rane) नमूद केले. ते म्हणाले शिवसेना नाव ते वापरू शकत नाहीत. त्यांच्याबाबत आयाेगाकडे तक्रार करावी अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना (eknath shinde) करणार असल्याचे राणेंनी नमूद केले.(Maharashtra News)

nitesh rane, uddhav thackeray, sanjay raut,
Shirdi Breaking News: १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; वाचा ग्रामस्थांच्या मागण्या (पाहा व्हिडीओ)

खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली तर त्यांना वेळाेवेळी प्रत्युत्तर देणार असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी दिला हाेता. आज राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर राणेंनी सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना राऊतांना प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीवर उद्धव ठाकरेंच ओझं झालेलं आहे असे म्हटलं. राणे म्हणाले माझ्या महितीनुसार एक मे ची महविकास आघाडीची सभा शेवटची सभा असेल. या पुढे वज्रमूठ सभा होणार नाही अशी माझी माहिती आहे. यावर राऊतांनी स्पष्टीकरण द्यावे असे राणेंनी नमूद केले.

nitesh rane, uddhav thackeray, sanjay raut,
Mahadevrao Mahadik On Satej Patil : मी शेलारमामा, आलते शड्डू मारायला शिकवायला...फूकून उडवून टाकेन; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

संजय राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात शिवसेना व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्धल मोठं मोठ्या बाता मारतात ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीख व वर्ष पण माहीत नाही त्याला शिवसेना व बाळासाहेबांबद्धल बोलण्याचा अधिकार आहे का? हा राजकीय आरोप करत नाही मुद्धाम मी आपल्याला एक व्हिडिओ दाखवतो जेणेकरून महाराष्ट्राला कळूदे ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहीत नाही. तो शिवसेनेची बाता करतो. म्हणून मी काल हा ओरिजनल नाही चायनिज मॉडेल आहे असे बोललो होतो हा लोकप्रभे मद्धे असताना बाळासाहेबांना शिव्या द्यायचा (व्हिडिओ दाखवला)

कडवट शिवसैनिक काय बोलतात की शिवसेनेचा जन्म 1969 ला झाला शिवसेनेचा जन्म 19 जून 1966 ला झालेला आहे.ज्याला शिवसेनेचा स्थापनेचा दिवस माहीत नाही तो शिवसेनेवर आम्हाला बोलतो आम्हाला शिकवतो, डुप्लिकेट असेही राणेंनी म्हटलं

nitesh rane, uddhav thackeray, sanjay raut,
Navi Mumbai Water Cut : नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा ! आजपासून कपातीस प्रारंभ, जाणून घ्या वेळापत्रक (पाहा व्हिडीओ)

मी एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत व शिवसेना नेत्यांशी बोलणार आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिलेला आहे. शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ साहेबांजवळ आहे. ज्या पद्धतीने संजय राऊत उद्धव ठाकरे असतील किंवा ठाकरे गटाचे लोक वारंवार शिवसेना शिवसेना बोलतात हा निवडणूक आयोगाचा अपमान आहे.

शिवसेना नाव ते वापरू शकत नाहीत त्यांना स्वतःला ठाकरे गट अथवा शिवसेना उ बा ठा म्हणावं लागेल. उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष राहिलेले नाहीत मी शिवसेना नेते आणि शिंदे साहेबांना बोलणार आहे की तुम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार करा असे राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com