...तर तुम्हांला एक मिनीट देखील राहू देणार नाही : नितेश राणे

...तर तुम्हांला एक मिनीट देखील राहू देणार नाही : नितेश राणे
Nitesh Rane

सातारा : अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी तालिबानचे काैतुक करणा-या भारतीय मुसलमानांना नुकतेच सुनावले आहे. शहा naseeruddin shah यांनी व्यक्त केलेल्या मतांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे समर्थन केले जात आहे आणि त्यांच्यावर टीका देखील हाेत आहे. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांचे चिरंजीव नितेश राणे Nitesh Rane यांनी शहा यांच्या भुमिकेस पाठींबा देत इथं नीट नालायकांचे पार्सल तालिबानला पाठविण्याची क्षमता आमच्यांत असल्याचे म्हटले आहे.

राणेंनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात भारतात राहून काही माेजके नालायलक तालिबानचे समर्थन करीत असताना दिसत आहेत. जसं नसीरुद्धीन शहा यांनी सांगितले तसेच त्यांनी इस्लाम समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं राणेंनी नमूद केले आहे.

Nitesh Rane
रत्नागिरीच्या माणसांना मारायचे ठरवलंय का? निलेश राणे

अन्यथा यांचं पार्सल तालिबनला पाठविण्याची तयारी आणि क्षमता आमच्यामध्ये आहे. भारतात राहायचे असल्यास तालिबानचे समर्थन करीत असाल तर तुम्हांला एक मिनीट देखील राहून देणार नाही असे राणेंनी तालीबानचे समर्थन करणा-यांना ठणकावले आहे.

nitesh-rane-praises-actor-naseeruddin-shah-decision-on-indian-muslims-praising-taliban-sml80

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com