नितेश राणेंच्या वकीलांची सरकारी वकीलांशी खडाजंगी; उद्या निर्णय?

आमदार नितेश राणे यांनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
नितेश राणेंच्या वकीलांची सरकारी वकीलांशी खडाजंगी; उद्या निर्णय?
nitesh rane

सिंधूदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील (sindhudurg dcc bank election) प्रचार प्रमुख आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (bjp leader mla nitesh rane) यांचा अटकपुर्व जामीन अर्जावर उद्या (गुरुवार) न्यायालयात (pre-arrest anticipatory bail) सुनावणी हाेणार आहे. गेले दाेन दिवसांपासून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांनी दाेन्ही बाजूचा युक्तीवाद समजून घेतला. आमदार नितेश राणेंचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी विविध मुद्दे मांडत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयास मागणी केली. त्यानंतर राणेंच्या वकीलांनी त्यांचे मुद्दे मांडले. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत राणेंच्या अटकपुर्व जामीन अर्जावर काेणताही निकाल झालेला नाही.

या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्यासमाेर आज झाली. पाेलिसांनी (police) ताब्यात घेतलेले पाच आराेपी हे पुण्यातील (pune) आहेत. त्यांचा तक्रारदाराशी काही संबंध नाही असे सरकार पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान नेमका हा हल्ला काेणी केला. प्रत्यक्षरित्या मारहाणीसाठी उपस्थित नसले तरी आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी कट कारस्थान केले असावे असा मुद्दा सरकार पक्षाच्यावतीने मांडण्यात आला. या प्रकरणात संताेष सातपुते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चाैकशी करणे आवश्यक हाेती. सरकारी वकीलांनी पाेलिसांवर देखील वेगवेगळ्या कारणांवर आक्षेप नाेंदविले.

दरम्यान पुण्यातील पाच आराेपींची नावे पाेलिसांनी जाहीर केली नाहीत. यामध्ये नेमकं गाैडबंगाल काय आहे अशी येथे चर्चा सुरु आहे. यावर सरकारी वकीलांनी देखील संबंधित आराेपी हे एकमेकांच्या संपर्कात हाेते. या सर्वांची पाेलिसांना चाैकशी करणे आवश्यक आहे. धीरज जाधव, ज्ञानेश्वर माऊल आणि सचिन सातपुते यांचा आमदार नितेश राणे आणि त्यांच्या पीए बराेबर संबंध आहेत. नितेश राणे यांच्या पीएकडून सचिन सातपुते यास ३३ वेळा दूरध्वनी केला गेला असा युक्तीवाद केला.

nitesh rane
गुन्हेगार पाताळात लपला असला तरी पाेलिस त्यास शाेधतील : राऊत

राणेंच्या वकीलांची आणि सरकार वकीलांची सुनावणी दरम्यान खडाजंगी झाली. राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी सरकारी वकीलांवर वेळ काढूपणा करीत असल्याचे नमूद केले. नितेश राणेंच्या मोबाईलवरून आरोपीला एकही काॅल गेला असा पुरावा नाही असे देसाईंनी नमूद केले. सचिन सातपुते यांचे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसमवेत संबंध होते. तो भाजपचा कार्यकर्ता होता. मग नितेश राणे यांचा फोटो महत्वाचा आहे का? या संपूर्ण प्रकरणात गोट्या सावंत यांचा सहभाग कसा? या बद्दल कोणतीही परिस्थिती या संपूर्ण केसमध्ये समजत नाही.

देसाईंच्या वक्तव्यावर घरतांचा आक्षेप

महाराष्ट्रात एवढे गुन्हे असताना आयजी, रायगड पोलिसांची टीम इथे का. एवढे गुन्हे असताना वरीष्ठ सरकारी वकिलाला तातडीने नेमले जातात. संग्राम देसाईंच्या या वक्तव्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप घेतला.

nitesh rane
५० रुपयांत दारु देणार; नेत्याचे आश्वासन

दरम्यान मंगळवारी दाेन्ही पक्षाकडून जाेरदार युक्तीवाद करण्यात झाला. सातपुते यास दिल्लीत अटक झाली हाेती. सातपुते आणि राणे यांचा सीडीआर (call record data) मिळते जुळते असल्याचा दावा पाेलिसांनी केला हाेता. त्यामुळे नितेश राणेंची अडचणी वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात हाेती. नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे संभाषण हाेणे म्हणजे राणेंनी कटकारस्थान केले असे हाेत नाही. पाेलिसांनी अनेक गाेष्टी माध्यमांपासून लपवली आहे. पाेलिसांवर राजकीय दबाव असल्याने नितेश राणेंचे नाव गाेवलं गेले असं राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी मंगळवारी नमूद केले हाेते.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.