आपला तो बाब्या अन् दुसर्‍याचं ते कार्ट! राणेंचा राऊतांना चिमटा
nitesh rane sanjay raut

आपला तो बाब्या अन् दुसर्‍याचं ते कार्ट! राणेंचा राऊतांना चिमटा

मुंबई : गुजरात माॅडेलवर बाेलण्यापेक्षा सर्वात जास्त भ्रष्टाचार, जास्त पैसे खाण्याचे काम मुंबई माॅडेलमध्ये झाले असा आराेप करीत भाजप नेते नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांनी मुंबई माॅडेलवर प्रकाशझाेत टाकावा असा चिमटा काढला. nitesh-rane-questions-about-mumbai-model-sanjay-raut-gujarat-political-news-sml80

nitesh rane sanjay raut
हजर नव्हे..! पत्रकारांशी अधिक न बोलता नारायण राणे निघून गेले

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून भुपेंद्र पटेल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलाविषयी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून खासदार संजय राऊत यांनी हेच का गुजरात माॅडेल अशी टीका केली आहे. यावर भाजप नेते नितेश राणे म्हणाले आपला ताे बाब्या अन् दूस-याचे ते कार्ट अशी मराठीत एक म्हण आहे. अगदी तसेच घडतय बघा. खासदार राऊतांनी मुंबई माॅडेलवर प्रकाशझाेत टाकावा असा चिमटा काढला आहे.

राणे म्हणाले बहुचर्चित मुंबई माॅडेलचे बाेला. काेराेनाच्या काळात मुंबई आयुक्त परदेशी यांना बदलावे लागले. असं का घडले. सर्वात जास्त मृत्यू झाले ते मुंबई माॅडेल, नाईट लाईफ गॅंगला जास्त ठेके दिले ते मुंबई माॅडेल, काेराेनाचे सर्वांत मृत्यू झाले ते मुंबई माॅडेल यावर चर्चा करा. त्यानंतर गुजरात माॅडेलवर बाेला असे राणेंनी सुनावले.

आयुक्त परदेशी यांना बदलण्याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार आणि मुंबई माॅडेलचे अपयश हेच आहे. सायन रुग्णालयात मृतदेह सापडले. किती माेठी बाेंबाबाेंब झाली. त्याविषयी बाेला. गुजरात माॅडलेची चर्चा करण्यापेक्षा तुमचं मुंबई माॅडेलचे काय झाले त्याबाबत बाेला. तुम्हांला आयुक्त का बदलावा लागला याचे उत्तर जनतेला द्या अशी मागणी राणेंनी nitesh rane sanjay raut संजय राऊतांना केली.

सर्वात जास्त भ्रष्टाचार, जास्त पैसे खाण्याचे काम मुंबई माॅडेलमध्ये झाल्याचा आराेप राणेंनी करुन जरा मुंबई माॅडेलवर प्रकाशझाेत टाका असा चिमटा राणेंनी खासदार राऊतांना काढला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com