नितेश राणेंचे शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ?

कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र येण्याची वेळ आली तर खांद्याला खांदा लावून काम करू असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
नितेश राणेंचे शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ?
नितेश राणेंचे शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ?SaamTv

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला नगरपरिषद-सागररत्न मत्स्यबाजारपेठ लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज शिवसेना खासदार विनायक राऊत, आ. नितेश राणे, आ. दीपक केसरकर आणि आ. रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर विराजमान झाले होते. Nitesh Rane's Signs of alignment with Shiv Sena?

हे देखील पहा -

यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही जुळवून घेण्याचे वक्तव्य करत शिवसेनेसोबत देखील विकासात्मक कामांच्या अनुषंगाने मिळते-जुळते घेण्याचे संकेत दिल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर शरसंधान करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या राणे पिता-पुत्रांची शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळख आहे. मात्र , वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण येणे निश्चित आहे.

नितेश राणेंचे शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ?
बेरोजगारीने तरुणाईची गुन्हेगारीकडे वाटचाल!

नितेश राणे या कार्यक्रमादरम्यान म्हणाले, आजचा एक चांगला दिवस नगरपरिषदेच्या वतीने आलाय, आज चांगलं चित्र या व्यासपीठावर निर्माण झालं आहे. राज्य भरामध्ये युतीची चर्चा होतेय असं म्हणत नितेश राणेंनी एका वेगळ्या राजकीय समीकरणावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला.

पुढे ते म्हणाले, हल्ली ऐकलं होतं की युतीची चर्चा बंद झाली आहे. मात्र, आज हे व्यासपीठ बघितल्यानंतर युतीची चाहते नक्कीच सुखावले असतील. जिल्ह्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र येण्याची वेळ जरी आली तरी सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करू.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com