Nitin Gadkari On Petrol| पेट्रोल पुढील ५ वर्षांत हद्दपार; बाइक, कारबाबतही नितीन गडकरींनी केलं मोठं विधान

नितीन गडकरींनी पेट्रोलबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या पाच वर्षांत पेट्रोल देशातून हद्दपार होईल, असे ते म्हणाले.
Nitin Gadkari claims in Next Five Years Petrol Can ban in India
Nitin Gadkari claims in Next Five Years Petrol Can ban in IndiaSAAM TV

अकोला: महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल-डीझेल महाग झाले आहे. महागाईनं उच्चांक गाठल्यानं वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे. इंधनदर किंचित कमी झाले तर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळतो. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात पेट्रोलबाबत मोठं विधान केलं आहे. देशात पुढील पाच वर्षांत पेट्रोल हद्दपार होईल, असा दावा गडकरींनी केला आहे. (Nitin Gadkari claims in Next Five Years Petrol Can ban in India)

Nitin Gadkari claims in Next Five Years Petrol Can ban in India
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर प्रचंड घसरले; पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? पाहा आजचा भाव

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) गुरुवारी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरींना विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. या सोहळ्यातील भाषणात नितीन गडकरी यांनी पेट्रोलबाबत (Petrol) मोठे भाष्य केले. विदर्भातील बायो-इथेनॉलचा वापर आता वाहनांमध्ये होऊ लागला आहे. ग्रीन हायड्रोजन विहिरीतील पाण्यापासून तयार केला जाऊ शकतो आणि ७० रुपये प्रतिकिलोने विकला जाऊ शकतो, असे गडकरी म्हणाले.

अशात पुढील पाच वर्षात पेट्रोल देशातून हद्दपार होईल, असे नितीन गडकरी म्हणाले. कुणीही शेतकरी (Farmer) केवळ गहू, भात, मक्याच्या शेतीतून आपलं भविष्य बदलू शकत नाही. शेतकऱ्यांना केवळ उत्पादक नाही तर उर्जा उत्पादकही व्हावे लागेल, असेही ते म्हणाले. इथेनॉलसंबधी एका निर्णयाने देशाची २० हजार कोटी रुपयांची बचत होत आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली.

Nitin Gadkari claims in Next Five Years Petrol Can ban in India
भविष्यात कारखाने आणि वाहने हायड्रोजनवर चालणार; नितीन गडकरी यांचे पुन्हा धमाकेदार वक्तव्य

आगामी काही वर्षांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर धावू शकतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. विदर्भातून बांगलादेशला कपाशीच्या निर्यातीची योजना विचाराधीन आहे. त्यासाठी विद्यापीठांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विद्यालये खूप काही करू शकतात, असेही ते म्हणाले.

Edited by - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com