'मोदींनी माझे पंख कापल्याचं नितीन गडकरी म्हणाले होते'; खैरेंच्या वक्तव्याने खळबळ

'राज ठाकरे यांना टीव्हीवर दाखवण्यासाठी भाजपने टीव्ही चॅनल वाल्यांना स्पॉन्सर केलंय'
'मोदींनी माझे पंख कापल्याचं नितीन गडकरी म्हणाले होते'; खैरेंच्या वक्तव्याने खळबळ
Nitin Gadkari/Narendra ModiSaam TV

औरंगाबाद - मी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मागण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे गेलो होतो. मात्र, 'निधीला कात्री लावत पंतप्रधान मोदींनी माझे पंख छाटले' असल्याचं गडकरींनी आपणाला सांगितलं असा दावा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. ते आज औरंगाबादमधील तापडिया नाट्य मंदिरात शिवसैनिक प्रशिक्षण शिबिर पार पडलं या प्रशिक्षण शिबिरात बोलताना खैरे यांनी आता आघाडी फुटू शकत नाही. आघाडी पूर्ण 5 वर्ष चालेल असा विश्वास व्यक्त केला. तसंच यावेळी त्यांनी हा अनोखा गौप्यस्फोट देखील केला.

तसंच यावेळी त्यांनी भाजपवरती गंभीर आरोप केला. ते म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सारखं सारख टीव्हीवर का दाखवता ? शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सवाल, राज ठाकरे यांना टीव्हीवर दाखवण्यासाठी भाजपने टीव्ही चॅनल वाल्यांना स्पॉन्सर केलं असल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला.

हे देखील पाहा -

ते म्हणाले, मी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मागण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेलो होतो. मात्र, निधीला कात्री लावत पंतप्रधान मोदींनी माझे पंख छाटले असल्याचं गडकरींनी आपणाला सांगितलं. तसंच राज ठाकरे यांना सारखं सारखं का टीव्हीवर दाखवता ? असा सवाल शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांना टीव्हीवर दाखवण्यासाठी भाजपने (BJP) टीव्ही चॅनल वाल्यांना स्पॉन्सर केलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसंच मुंबईचे लोक किरीट सोमय्याला बोबड्या म्हणतात तर मी त्याला नेहमी शक्ती कपूर म्हणतो. तो शक्ती कपूर असून त्याच्या चोऱ्या मला माहित आहेत असं वक्तव्य करून खैरे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.