
मोबीन खान
अहमदनगर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यतत्परतेमुळे देशात ओळखले जातात. त्यांच्या खात्याच्या विकासकामामुळे देशभर नावाजले जातात. सध्या नितीन गडकरी (Nitin Gadkari) साखर कारखान्यावर केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. दरम्यान, गडकरी यांनी एक नवं धमाकेदार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Nitin Gadkari Latest News In Marathi)
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचा ८२ वा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. त्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
'उस हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचं मापदंड झालं आहे. आज गहू (Wheat) स्वस्त आणि ब्रेड महाग झाला आहे. टोमॅटो स्वस्त मात्र सॉस महाग झाला आहे. या वर्षी साखरेचे उत्पादन जास्त झालं आहे. आता केवळ साखर बनवण्याऐवजी वेगळा विचार करावा लागेल. मी तेरा वर्षापासून साखर कारखाना चालवतोय. खूप कस निघाला. यावर्षी कारखाना नफ्यात आला आहे. पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन (Hydrogen) वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात गाड्या, कारखाने, विमान हायड्रोजनवर चालणार. मी सांगत असल्याचा बायकोला विश्वास बसत नव्हता. म्हणून मी गाडी चालून दाखवली आहे. मी बोलतो ते करतोच', असं धमाकेदावर वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
पुढे गडकरी म्हणाले, 'भविष्यात चारचाकी आणि दुचाकी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या येणार आहे. शेतकरी उर्जादाताही बनायला हवा. आता आपला दृष्टीकोन भविष्याच्या दृष्टीने बदलावे लागेल. तरुणांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचं आहे'.
मधुकर पिचडांवर भाष्य करताना गडकरी म्हणाले, 'महाराष्ट्रात आदीवासींसाठी काम करणाऱ्या नेत्यांमध्ये मधुकर पिचड अग्रस्थानी आहेत. पिचड साहेबांशी असलेल्या प्रेमाच्या संबंधामुळे आज मी कार्यक्रमाला आलोय. कोणताही माणूस जातीपेक्षा त्याच्या कार्याने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे नेते नाही आहेत. येणाऱ्या काळात जातीविरहित समाज व्यवस्था उभं करण्याचं आव्हान आहे. मात्र, प्रत्येक व्यक्तीला घर, अन्न, रोटी , कपडा मिळत नाही, तोवर हे शक्य नाही'.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.