वैद्यनाथचे कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही; कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरण

स्पष्टीकरण दिल्याचे पत्रक, पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने काढण्यात आले आहे.
वैद्यनाथचे कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही; कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरण
वैद्यनाथचे कोणतेही बँक खाते जप्त झाले नाही; कार्यकारी संचालकांचे स्पष्टीकरणSaam Tv

विनोद जिरे

बीड - भाजप BJP नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या वैद्यनाथ कारखान्याचे बँक Bank खाते सील केल्यानंतर, कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी स्पष्टीकरण दिल्याचे पत्रक, पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने काढण्यात आले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बँक खाते जप्त करण्यात आलेले नाही. यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जी.पी.एस दीक्षितूलू GPS Dikshitulu यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे वैद्यनाथ कारखाना सध्या आर्थिक अडचणीतून सामोरे जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारच्या बातम्या देणे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आणणे. हे एकूणच राजकीय खोडसाळपणा आहे. कारखान्याचे असे कोणतेही बँक खाते सील झालेले नाही.असे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी सांगिलते आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com