नांदेड शहरात 'या' ठिकाणी 'नो बॅनर झोन'; रस्ते घेणार मोकळा श्वास
नांदेड -वाघाळा शहर महानगरपालिका

नांदेड शहरात 'या' ठिकाणी 'नो बॅनर झोन'; रस्ते घेणार मोकळा श्वास

नांदेड शहर स्वच्छ व सुंदर असायलाच पाहिजे. एवढेच नाही तर बॅनरबाजीमुळे विद्रुप होणार नाही याची काळजी घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकर परदेशी यांनी प्रयत्न केले होते.

नांदेड : नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुख्य रस्त्यावर व चौकात अनेक ठिकाणी विनापरवाना बॅनर लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करुन शहराचे विद्रूपीकरण होत आहे. एवढेच नाही तर अपघाताच्या घटना देखील घडत आहेत. काही अतीउत्साही कार्यकर्ते आपल्या नेत्याला खूष करण्यासाठी नको त्या ठिकाणी बॅनरबाजी करुन प्रशासनाला आव्हान देत होते. अशा कार्यकर्त्यांना आता चाप बसणार आहे. परंतु या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी तरच सुंदर शहर मोकळे रस्ते दिसतील अशी माफक अपेक्षा नांदेडकरांमधून व्यक्त होत आहे. 'No Banner Zone' -at 'this' -in -Nanded-city- The- roads- will- take -a- deep -breath

नांदेड शहर स्वच्छ व सुंदर असायलाच पाहिजे. एवढेच नाही तर बॅनरबाजीमुळे विद्रुप होणार नाही याची काळजी घेत तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकर परदेशी यांनी प्रयत्न केले होते. त्यांनी त्यावेळेस चक्क एका नगरसेवकाच्या बॅनरवरुन संबंधीत नगरसेवकाला समज दिली होती. त्यानंतर काही प्रमाणात या बॅनरबाजीला चाप बसला होता. मात्र त्यांची बदली होताच पुन्हा मागचे पाढे सुरु झाले.

हेही वाचा - जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली होती. परंतु जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व संपूर्ण टीमने मोठ्या कुशलतेने यावर मात करुन जिल्ह्याला कोरोना धोक्यातून बाहेर काढले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला ताफा थांबवून विनापरवानगी लावलेले आपलेच बॅनर हाताने काढले होते. यावेळीही महापालिका प्रशासनाला घाम फुटला होता. शहरात मुख्य चौकात व रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल असे होर्डींग्ज लावू नका अशा सुचना यापूर्वीही अशोक चव्हाण यांनी दिल्या होत्या.

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून महापालिका आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांनी सात ठिकाणी खासगी जागा सोडून ' नो बॅनर झोन ' क्षेत्र घोषित करुन तसे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे आता बॅनरबाजीला चाप बसणार आहे.

येथे क्लिक करा- SSC Class 10th Result 2021: कोकण अव्वल तर राज्याचा निकाल 99.95 टक्के

शहरात विनापरवाना विविध कार्यक्रमासह जाहिरातीचे फलक लावून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. तसेच या फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ता. 23 जून 2021 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 26 पारित झाला होता. शहरातील मुख्य चौकात व रस्त्यावर विनापरवानगी बॅनर लावू नका असा सुर सर्वसाधारण सभेत निघाला होता. अखेर शहरातील विनापरवानगी लावण्यात येणाऱ्यांवर महापालिका करडी नजर ठेवणार आहे.

हे आहेत 'नो बॅनर झोन'

शहरातील राज काॅर्नर, वर्कशॉप कॉर्नर, आयटीआय कॉर्नर (महात्मा फुले पुतळा), शिवाजीनगर, वजिराबाद चौक (मुथा चौक), देगलूर नाका, अण्णाभाऊ साठे चौक आदी ठिकाणी खासगी जागेवरील जाहिरात फलक वगळून क्षेत्र घोषित करण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com