नागपूर एसटी स्टँड वरील कँटीन मध्ये शुकशुकाट

कँटीन मधील कर्मचारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत
नागपूर एसटी स्टँड वरील कँटीन मध्ये शुकशुकाट
नागपूर एसटी स्टँड वरील कँटीन मध्ये शुकशुकाटसंजय डाफ

नागपूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला तोटा होत आहे. मात्र, एसटीशी निगडित इतर सर्व घटकांनाही याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातीलच एक म्हणजे बस स्टँड वरील कँटीन. एरवी ही कँटीन प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांनी भरून असायची, वर्दळ असायची. मात्र, आता या कँटीन मध्ये शुकशुकाट आहे.

हे देखील पहा -

एरवी कँटीन मधीन कर्मचाऱ्यांना एक मिनिट देखील वेळ नसायचा. मात्र, आता हे कर्मचारी ग्राहकांची वाट बघत दिवसभर बसून असतात. एरवी साधारणतः 100 प्लेट नाश्ता खपला जायचा. मात्र, आता 10 प्लेट सुद्धा नाश्ता खपत नाही. सायंकाळी तोही फेकावा लागतो. ग्राहक नसेल तर आमचा पगारही निघत नसल्याचं कँटीनच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com