सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्त

अकोल्यात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंग च्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्त
सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्तजयेश गावंडे

अकोला : अकोल्यात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंग च्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता गाडी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. No documents with you then your bike will be confiscated

तुमच्या जवळ तुमच्या गाडीचे कागदपत्र सोबत नसतील, मोबाईल मध्ये DG लॉकर किंवा तत्सम अधिकृत अँपवर स्कॅन कॉपी न ठेवता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची वाहने वाहतूक कार्यालयात जमा करून ठेवण्याची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. सहा महिन्यांत पोलिसांनी तब्बल 2900 वाहनांवर कारवाई करत ती वाहने जप्त केली आहेत.

हे देखील पहा -

वाहनांची कागदपत्रे पडताळून नंतरच दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येत आहेत. ह्या मोहिमेचे फलित म्हणून आता पर्यंत 3 दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून त्या पैकी 2 अकोला शहर व एक गाडगे नगर अमरावती येथील आहेत. आता पर्यंत एकूण 2900 दुचाकी वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आल्या होत्या. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वाहनांची पूर्ण पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

सावधान! कागदपत्रे सोबत नसतील तर तुमची गाडी होईल जप्त
चंद्रपुरात महागाईविरुद्ध महिला काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

मोटारसायकल चोरीवर आळा बसावा व चेन स्नॅचिंग च्या घटनांवर आळा बसावा म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार ही मोहीम राबवित आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com