लातुरात विसर्जनाची मिरवणूक नाही, संकलन केंद्रात मुर्त्या दान

जवळपास ४४ हजार घरगुती गणेश मूर्तींचे संकलन
लातुरात विसर्जनाची मिरवणूक नाही, संकलन केंद्रात मुर्त्या दान
लातुरात विसर्जनाची मिरवणूक नाही, संकलन केंद्रात मुर्त्या दानदीपक क्षीरसागर

लातूर - कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर लातूरमध्येही Latur श्री गणेशाची विसर्जन Ganpati Visarjan मिरवणूक निघाली नाही. पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या विविध संकलन केंद्रात या गणेशमूर्ती दान केल्या जातात. सार्वजनिक गणेश मंडळांनी सार्वजनिक गणपतीची ०४ फुट उंचीच्या मूर्ती तसेच घरगुती गणेशाची ०२ फुटापर्यंतची मूर्ती देखील महापालिकेच्या या संकलन केंद्रात देण्यात आल्या.

हे देखील पहा -

शहरातील विविध प्रभागातील १६ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी करण्यात आली होती. ज्यात नागरिक आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत संकलन केंद्रात जमा करीत होते. गेल्या वर्षी जवळपास ४४ हजार घरगुती गणेश मूर्तींचे संकलन झाले होते. त्यामुळे हा आकडा यावर्षी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com