नागपूमध्ये सणासुदीच्या काळात लॉकडाऊन नाही - नितीन राऊत

वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय
नागपूमध्ये सणासुदीच्या काळात लॉकडाऊन नाही - नितीन राऊत
नागपूमध्ये सणासुदीच्या काळात लॉकडाऊन लावणार नाही - नितीन राऊत-SaamTV

नागपूर : नागपूरकर आणि नागपूरमधील व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण सणासुदीच्या काळात प्रशासन लॉकडाऊन (Lockdown) लावणार नसल्याचं आज पालकमंत्री नितीन राऊत(Nitin Raut) यांनी घोषीत केलं आहे. (No lockdown in Nagpur)

हे देखील पहा-

काहि दिवसांपुर्वी पत्रकारांशी बोलताना कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसानंतर लॉकडाऊन लावणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले होते. मात्र यानंतर लोकभावनेचा झालेचा उद्रेक आणि व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर पालकमंत्र्यांनी आपल्या भूमिकेवरुण माघार घेतल्याचे दिसून येत आहे.

नागपूमध्ये सणासुदीच्या काळात लॉकडाऊन लावणार नाही - नितीन राऊत
आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याला राजकीय वळण; श्रेयवादावरुन हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका

दरम्यान अचानक वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय आपण घेतला असून या निर्णयामुळे गणपती आणि आगामी सणांच्या काळात लॉकडाऊन लागणार नसल्यानं प्रशासनाने स्पष्ट केलं असल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. नागपूर शहरात आज 4 तर ग्रामीण भागात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

निर्बंध नाहीत नियम मात्र कठोर - राजेश टोपे

उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सावावर राज्यात कुठल्याही प्रकारचे निर्बध नाहीत मात्र या दहा दिवसांच्या काळात कोरोना नियमांचे कठोर पालन करावे लागणार आहे. केरळ मध्ये उत्सवामुळेच कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली होती. आणि या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाची संख्या वाढू नाही म्हणूम सर्वांनी कठोर निर्बंध पाळावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com