काहीही झालं तरी शिवसेना आमचा भाऊच - चंद्रकांत पाटील

"लहान मोठं ठरविण्याच्या नादात आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली."
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलSaamTV

परभणी : मोठा भाऊ छोट्या भावाची काळजी करेना आणि सगळंच आपल्या ताटावर ओढायला लागला होता. असा टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला लगावला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज परभणी दौऱ्यावर आले होते त्यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत असतांना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. (No matter what happens, Shiv Sena is our brother - Chandrakant Patil)

हे देखील पहा -

पाटील म्हणाले '2014 साली अमितभाई शाह (Amit Shah) भाजप पक्षाचे अध्यक्ष (BJP party president) झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला 50-50 फॉर्मला सांगितला मात्र मोठया भावाला जमलं नाही. शेवटी अमित शाह म्हणले अस जमणार नाही , आपल्या पायावर उभं रहा, नंतर आमच्या कार्यकर्त्यांना कळलं आपली ताकत किती आहे. मोठया भावाने सर्वच जागा लढवल्या आणि निकाल 63, मात्र लहान भावाने केवळ 220 जागा लढवल्या निकाल 122 थोड्याक्यात हुकल नाहीतर 144 झाले असते असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच 2019 मध्ये 3 नापास झालेले एकत्र आले आणि 56 वाले मुख्यमंत्री झाले , 54 वाले उपमुख्यमंत्री झालेत आणि नंतर 44 वाले महसूलमंत्री पण जर त्यांच्यात हिम्मत असेल तर वेगवेगळं लढा.

चंद्रकांत पाटील
समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार - नवाब मलिक

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या बाय इलेक्शन (By Election) मध्ये भाजपा एक नंबरवर आणि क्रमांक चार शिवसेना गेली आहे. मात्र हा निकाल ऐकूण वाईट वाटलं "कारणं शेवटी काहीही झालं, वाद झाला तरी ते आपले' भाऊच' आहेतना वाटण्या झाल्या म्हणून काय झालं?" अस वक्तव्यं देखील त्यांनी परभणीमध्ये बोलताना केलं. तसेच लहान मोठं ठरविण्याच्या नादात आपल्याच पायावर कुऱ्हाड पडल्याच त्यांना आता कळालं असेल असा टोला त्यांनी सेनेला लगावला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com