'राज्यात कुठंही दंगल झाली तरी ती भाजपच्या माथीच लावतात'

'महाराष्ट्रत कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात व भाजपच्या (BJP) माथी दंगल लावतात.'
'राज्यात कुठंही दंगल झाली तरी ती भाजपच्या माथीच लावतात'
Shivrai KulkarniSaamTV

अमरावती : शहरात हिंसाचार झाल्यानंतर आज सायबर क्राईमचा धक्कादायक अहवाल हाती आला असून यामध्ये भाजप (BJP) प्रणित हिंदुत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचा अहवाल दिसून येत आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवरतीच भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी अमरावती (Amaravati) मध्ये संतप्त प्रतिक्रिया दिली.

Shivrai Kulkarni
'भाजपचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी; हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे जातील त्यांचे आम्ही समर्थन करु'

'हा सादर झालेला अहवाल (Report) खोटा असून महाराष्ट्रत कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात व भाजपच्या माथी दंगल लावतात असा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला.

दरम्यान तर राज्य सरकारने झालेल्या घटनेची चौकशी करावी, कोणालाही तरी जबाबदारी धरुन अमरावतीच्या अस्मितेचा अवमान करणं आहे तर लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे अशीही प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com