अल्टीमेटमची भाषा करण्याची गरज नाही, राज्य कायद्याने चालते- शंभूराज देसाई

राज ठाकरे यांच्यावर संभाजीनगर येथील सभेनंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्टीमेटमची भाषा करण्याची गरज नाही, राज्य कायद्याने चालते- शंभूराज देसाई
shambhuraj desaiSaam TV

सातारा: राज ठाकरे यांच्यावर संभाजीनगर येथील सभेनंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना विचारले असता त्यांनी अल्टीमेटम वगैरे असा कोणी देण्याची भाषा महाराष्ट्रामध्ये करू नये हे राज्य कायद्याने चालणारे असून कायद्याचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे असा इशारा त्यांनी या वेळी बोलत असताना दिला.

या वेळी बोलत असताना ते म्हणाले की संभाजीनगरच्या झालेल्या सभेनंतर पोलीस आयुक्तांनी सविस्तर तपास केल्या नंतर त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली असेल त्यांनी त्यामुळे केलेली कारवाई ही नियमाला धरून व अटींचा भंग झाला म्हणूनच केलेली आहे. ज्यांचा ज्यांचा या सभेत सहभाग होता ज्यांनी ज्यांनी त्या सभेमध्ये याठिकाणी भाग घेतलेला आहे अशा काही लोकांना कदाचित नोटीस दिल्या गेल्याची शक्यता आहे.

shambhuraj desai
5 स्पोर्ट्स अँकर ज्यांनी केले IPL मधील दिग्गज क्रिकेटर्सशी लग्न केले

मला सविस्तर त्यात माहिती प्राप्त नाही परंतु ज्याने कोणी अटींचे उल्लंघन केले असेल त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. अल्टीमेटम वगैरे असा कोणी देण्याची भाषा महाराष्ट्र मध्ये करू नये राज्यात कायद्याचे पालन आणि सगळ्यांनी केले पाहिजे त्यामुळे विशेषता सर्वसामान्य जनतेला कायदा हातात घेण्याची या कृतीमुळे त्रास होणार असेल, कायदा-सुव्यवस्था राज्यातली बिघडनार असेल तर पोलीस निश्चितपणे त्याच्यावर कठोर कारवाई करतील सध्या राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तर आमचे पोलिस प्रभावीपणे हाताळण्यासाठी सदैव तयार आहेत. आत्तासुद्धा पोलिसांचे कुठले परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी मध्ये आमचे पोलसांमध्ये आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.