लस घेतली नसल्यास गावात पाऊल ठेवू नये; ठेवल्यास २०० रुपये दंड

या निर्णयाबाबत गावातील प्रवेशद्वारावर तसेच ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
vaccination
vaccination

नांदेड (tembhurni) : काेविड १९ चे (covid19) रुग्ण गावात वाढू नयेत यासाठी गतवर्षी राज्यातील गावा गावांत वेशीच्या बाहेर ग्रामस्थांना ठेवले जात हाेते. त्यांची तपासणी केली जात हाेती. काेविड १९ चा (coronavirus) प्रादुर्भाव नसेल तरच संबंधितास गावात साेडले जात हाेते. आता पुन्हा तसाच प्रकार राज्यातील काही गावांमध्ये हाेत आहे. परंतु आता काेविड १९ प्रतिबंधात्मक लस घेतली (covid-19 vaccination) नसल्यास संबंधितास गावात पाऊल ठेवले दिले जात नाही. याबराेबरच संबंधितांकडून ग्रामपंचायत २०० रुपयांचा दंड (fine) आकारात आहे.

नांदेड (nanded) जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी (tembhurni) या गावात लसींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीने कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्यास संबंधितांना गावाच्या वेशी बाहेर थांबविले जात आहे. लसीकरण न केलेल्या व्यक्तीने गावात प्रवेश केल्यास स्थानिक ग्रामपंचायत २०० रुपयांचा दंड ठाेठावत आहे. या निर्णयाबाबत गावातील प्रवेशद्वारावर तसेच ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

टेंभुर्णीच्या सरपंच यशोदाबाई पाटील म्हणाल्या गावात येणाऱ्या प्रत्येकाने किमान लसीचा एक डोस घेणे आवश्यक आहे. फेरीवाले, कामगार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा एक लसीचा डाेस पुर्ण झाला नसल्यास संबंधितांस गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आमच्या गावातील लसीकरणाचा पहिला डाेस १०० टक्के पुर्ण झाला आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी जवळपास ७५ टक्के ग्रामस्थांनी दुसरा डोस घेतला आहे. काेराेनाच्या या महामारीत ग्रामस्थांची काळजी घेणे आमचे कर्तव्य असल्याने पंचायतीने कठाेर निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

vaccination
काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

या गावा नजीकच्या पवनमारी गावाने देखील लसीकरण न केलेल्या लोकांवर गावात येण्यासाठी बंदी घातली आहे. याबाबत माजी सरपंच प्रल्हाद पाटील म्हणाले ग्रामस्थांनी एकमताने बंदीला पाठिंबा दिला आहे. आपल्यापैकी अनेकांनी जवळच्या नातेवाईकांवर काेविड १९ मुळे काेण काेणत्या गाेष्टी सहन कराव्या लागल्या आहेत हे पाहिले आहे. त्यातून बरे झाल्यानंतरही काही व्यक्तींना वेगवेळ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोविडशी लढताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. या सगळ्याचा परिणाम पाहता गावकऱ्यांनी लसीकरण न झालेल्या व्यक्तीस गाव बंदीला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com