लस नाही तर वेतन नाही; महापालिकेच्या आयुक्तांचा फतवा

आयुक्त लहाने यांनी लस न घेणाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लस नाही तर वेतन नाही; महापालिकेच्या आयुक्तांचा फतवा
लस नाही तर वेतन नाही; महापालिकेच्या आयुक्तांचा फतवासंतोष जोशी

नांदेड - कोरोनाची Corona अद्यापपर्यंत लस न घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने Sunil Lahane यांनी चांगलाच दणका दिला आहे. आयुक्त लहाने यांनी लस Vaccine न घेणाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कोरोना निर्मुलनाचे काम केले अशांना कोरोनाचा धोका उत्पन्न होऊ शकतो.

या सर्वांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक होते मात्र अनेकांनी लस उपलब्ध असुन ही लस घेतली नाही त्यामुळे अशा लोकांचे आता जुलै महिन्याचे पगार निघणार नाहीत असा फतवा महापालिकेच्या आयुक्तांनी काढला आहे.

हे देखील पहा -

ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी लस घेतल्याचे प्रमानपत्र कार्यालयात सादर करावे तसचं काही कारणांस्तव डाॅक्टरांनी लस घेऊ नका असे सांगितले अशा लोकांनी तसे डाॅक्टरचे पत्र द्यावे असे आदेश आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी काढले आहे. महापालिकेत वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतचे कंत्राटी 3000 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 80 टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली मात्र आणखी अनेकांनी लस घेतली नाही त्यांना लस घेणे बंधनकारक असल्याचे आयुक्त लहाने यांनी स्पष्ट केले आहे.

लस नाही तर वेतन नाही; महापालिकेच्या आयुक्तांचा फतवा
माजी आमदार गणपतराव देशमुखांवर शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा

आतापर्यंत शहरातील दिड लाख लोकांना लस देण्यात आली आणि अडीच लाख लोकांना लस देण्याचे उद्दीष्ट असल्याचे आयुक्त लहाने यांनी सांगितले आहे. शहरात सध्या सहा हजार लस उपलब्ध आहेत. आयुक्तांनी वेतनवाढ रोखण्याचे आदेश देताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे हे मात्र नक्की.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com