लस नाही तर पगार नाही; अकोला महापालिका प्रशासनाचा निर्णय

लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश अकोला महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत.
लस नाही तर पगार नाही; अकोला महापालिका प्रशासनाचा निर्णय
लस नाही तर पगार नाही; अकोला महापालिका प्रशासनाचा निर्णयजयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : 'लस नाही तर पगार नाही' कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे कोरोना विरुध्दच्या लढ्यात आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत लस घेणे, अनिवार्य केले आहे. लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश अकोला महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत.

कोरोना लसीकरणात अकोला राज्यात पिछाडीवर असून अकोला जिल्ह्यात केवळ 54 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. अकोला महापालिकेत बावीसशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यापैकी किती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लसीकरण केले याबाबत संबंधित विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे.

दरम्यान, उपायुक्त डॉ. जावळे यांनी 30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के उद्दीष्ठ पूर्ण करा असे निर्देश देऊन डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन मिळणार नसल्याचे एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

लस नाही तर पगार नाही; अकोला महापालिका प्रशासनाचा निर्णय
आ. संजय शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची ग्रामसेवकांची मागणी

कोरोनाची साथ Corona Wave अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही उपायुक्त यांनी आवाहन केले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com