Latur, Water Supply
Latur, Water Supply Saam TV

Latur News : लातूरकरांनाे ! पाणी जपून वापरा, पूरवठा राहणार बंद

त्यापूर्वी मांजरा धरणावर उगम क्षेत्रात वीज मोटारी बिघाड झाला हाेता.

Latur News : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला आहे. मनपाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान जोपर्यंत दुरुस्ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत लातूर (Latur) शहराचे पाणी पूऱवठा बंद राहणार आहे.

Latur, Water Supply
Pandharpur News : विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात; एक ठार, 37 जखमी

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या दोन-तीन वर्षांपासून शंभर टक्के पाणीसाठा होत आहे. त्यामुळे मुबलक पाणी आहे. परंतु मनपाच्या पाणी (water) वितरण व्यवस्थेत दोष आहेत. वारंवार दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागतो. कधी हरंगुळ येथील शुद्धीकरण केंद्रावर बिघाड होतो. तर कधी धनेगाव धरणातील उगम क्षेत्रामध्ये बिघाड होतो.

Latur, Water Supply
Mahableshwar Accident News : महाबळेश्वरहून फ्रिज, टीव्ही घेऊन निघालेला टेम्पो दाेनशे फूट दरीत काेसळला

त्यामुळे लातूर शहरवासीयांना पाणीपुरवठ्याच्या (Latur Water Supply) गैरसोयीला सामोरे जावे लागते. महिन्याभरापूर्वीच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड झाला होता. त्यापूर्वी मांजरा धरणावर उगम क्षेत्रात वीज मोटारी बिघाड झाला. (Maharashtra News)

Latur, Water Supply
Sangli News : ख्रिस्ती बांधवांचा शुक्रवारी सांगलीत महामाेर्चा; विविध संघटनांचा पाठिंबा

त्यामुळे व्यत्य आला होता. आताही जलशुद्धीकरण केंद्रावर बिघाड झाला आहे. त्यामुळे किमान दोन-तीन दिवस पाणीपुरवठा (water supply) बंद राहण्याची शक्यता आहे. लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पावरून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. त्यानंतर हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण होऊन शहरातील जलकुंभावरून पाणी वितरण होते. यंदा मुबलक पाणी असूनही अडथळे आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com